परीक्षेत कमी गुण मिळाल्याने १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 03:59 PM2019-01-30T15:59:10+5:302019-01-30T16:00:16+5:30
मृत विद्यार्थी चेंबुरच्या एका उच्चभ्रू शाळेत शिकत होता. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला नैराश्य आले होते. या मुलाचे आई-वडील शनिवारी सायंकाळी त्याला घरी सोडून एका लग्नाला गेले होते.
मुंबई - चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्येतून १० वीतील विद्यार्थ्यांने गळफास लावून केली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चेंबूर येथे घडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या आई वडिलांना मानसिक धक्का बसला आहे.
मृत विद्यार्थी चेंबुरच्या एका उच्चभ्रू शाळेत शिकत होता. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला नैराश्य आले होते. या मुलाचे आई-वडील शनिवारी सायंकाळी त्याला घरी सोडून एका लग्नाला गेले होते. घरी परतल्यावर त्यांनी पाहिले असता त्याने सिलींग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला लगेच खाली उतरवून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित करण्यात आले.चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.लवकरच दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. दबावाखाली येऊन आत्महत्या करु नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना केले आहे.