शेगावातील धाडसी चोरीतील ११ आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त
By निलेश जोशी | Published: February 28, 2023 03:52 PM2023-02-28T15:52:34+5:302023-02-28T15:52:55+5:30
दरम्यान संघटीत पद्धतीने चोरी, जबरी चारी, खून आणि खरफोडी करणारी ही टोळी असून बुलढाणा जिल्ह्यासह अैारंगाबाद, जालना, परभणी, बिड, नांदेड, नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये या टोळीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
बुलढाणा : जिल्ह्यातील अलिकडील काळातील सर्वात मोठी धाडसी चोरी म्हणून गणल्या गेलेल्या शेगाव शहरातील आनंद पालडिवाल यांच्या घरी झालेल्या धाडसी घरफोडीतील ११ ही आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकूडन पोलिसानी ४० लाख ३१ हजार ९८१ रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील धाडसी चोरीमधील ही एक चोरी नाशिकमधून मिळालेल्या एका छोट्या धाग्याच्या आधारावर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी संदर्भाने शेगावात सविस्तर माहिती दिली.
दरम्यान संघटीत पद्धतीने चोरी, जबरी चारी, खून आणि खरफोडी करणारी ही टोळी असून बुलढाणा जिल्ह्यासह अैारंगाबाद, जालना, परभणी, बिड, नांदेड, नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये या टोळीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. आरोपींमध्ये वैभव मानवतकर (२६, रा. सोनाटी, मेहकर), मुंजा तुकाराम कहाले (२०), प्रितम अमृतराव देशमुख (२९, रा. पिंप्री देशमुख, परभणी), अजिंक्य दिंगबर जगताप (२७, रा. पुंगळा, जिंतुर), नवनाथ विठ्ठल सिंदे (१९, रा. गंगाखेड), कैलास लक्ष्मण सोनार (२४, जेलरोड, नाशिक), मयूर राजू ढगे (२२), सौरभ राजू ढगे (२६, दोघे. रा निफाड), सुजीत अशोक साबळे (२७, खडक मालेगाव, ता. निफाड), प्रविण दीपक गागुर्डे (रा. सातपुर, नाशिक) आणि पुजा प्रविण गागुर्डे (रा. सातपुते, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याकडून नगदी १ लाख ५० हजार ७३० रुपये, ४६७ ग्रमॅचे ३७ लाख ४३ हजार ३५१ रुपयांचे हिरे जडीत सोन्याचे दागिने, १ लाख २ हजार १८२ रुपयांचे चांदीचे दागिने व अन्य मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी धाडसी चोरी
जिल्ह्याच्या गुन्हेगारीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धाडसी चोरी होती. यात ९२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी शेगाव येथील आनंद पालडिवाल यांच्या घरातून लंपास केला होता. यात नगरी २५ लाख रुपयांयस सोन्या-हिऱ्याचे ६५ लाखांचे दागिन्यांसह अन्य मुद्देमाल १६ जानेवारी २०२३ रोजी लंपास केला गेल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी पालडिवाल हे त्यांच्या आईच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी जालना येथे गेले होते. परत आले असता हा प्रकार उघड झाला होता. शेगाव येथे पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी या गुन्ह्या संदर्भात सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना २८ फेब्रुवारी रोजी दिली.