मुळशी तालुक्यात अज्ञाताने केलेल्या विषप्रयोगामुळे ११ जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 05:19 PM2018-12-05T17:19:54+5:302018-12-05T17:21:39+5:30
अज्ञात शेतकऱ्याने केलेल्या विषप्रयोगामुळे डोगरांच्या पठारावरील अकरा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
चांदखेड : पिंपळोली ( मुळशी) येथील डोगरांच्या पठारवर अज्ञात शेतकऱ्याने केलेल्या विषप्रयोगामुळे डोगरांच्या पठारावरील अकरा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तर तीन गाई व आठ बैलाचा समावेश आहे. ही जनावरे मावळ तालुक्यातील पुसाणे, दिवड तसेच मुळशी तालुक्यातील पिंपळोली ,शेळकेवाडी, गवारेवाडी, खांबोली ,कातरखडक येथील शेतकऱ्यांची आहेत. डोंगरावर चारा उपलब्ध झाल्यानंतर शेतकरी जनावरे पठारावर चरण्यासाठी सोडत असतात व पठारावरील पाणी संपल्यानंतर आपली जनावरे घरी घेऊन जातात. परंतु या जनावरांना अज्ञात शेतकऱ्याने केलेल्या विषप्रयोगाने आपला जीव गमवावा लागला आहे. मृत जनावरांचे शवविच्छेदन पंचायत समिती मुळशीचे पशुधन विकास अधिकाऱ्यांनी भेट दिली. संबंधित शेतकऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली आहे.