मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून शस्त्राची खरेदी-विक्री करणाऱ्या ११ जणांना अटक; १३ पिस्टलसह ३६ काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 22:01 IST2022-02-08T22:01:05+5:302022-02-08T22:01:51+5:30
अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून शस्त्राची खरेदी-विक्री करणाऱ्या ११ जणांना अटक; १३ पिस्टलसह ३६ काडतुसे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डोंबिवली, कल्याणमधून शस्त्राची खरेदी विक्री करणाऱ्या ११ जणांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. अटक आरोपीकड़ून १३ पिस्टलसहीत ३६ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आले.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी काळाचौकी युनिटने शस्त्राची विक्री करणाऱ्या एका आरोपीला मुलुंड परिसरातून अटक केली. याप्रकरणी त्याच्या विरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. आरोपीच्या चौकशीतून अन्य आरोपीची माहिती मिळताच पथकाने, मुलुंड, कांदिवली, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि उरण परिसरात एटीएसच्या पथकाने छापेमारी केली.
यादरम्यान ११ जणांना अटक केली. त्यांच्याकड़ून १३ फॅक्टरी मेड पिस्टल आणि ३६ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. त्यांनी हा शस्त्रसाठा कशासाठी आणला होता? ते कुठल्या कटाच्या तयारीत होते का? याबाबत पथक अधिक तपास करत आहे. तसेच त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे.