बंद शाळेचे कुलूप तोडून ११ संगणक पळविले, मुख्याध्यापकाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 11:51 AM2022-02-07T11:51:14+5:302022-02-07T11:51:56+5:30
प्रभारी मुख्याध्यापक योगेश सोपान मारकड (३०, रा. देगाव, ता. बार्शी) यांनी पांगरी पोलीसांत ४ फेब्रुवारीला रात्री तक्रार दिली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी/कुसळंब : बार्शी तालुक्यातील नारी येथील सरस्वती विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथील बंद असलेल्या संगणक कक्षाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ११ संगणकांसह इतर साहित्य असे १ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना दि. २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारीदरम्यान घटली.
प्रभारी मुख्याध्यापक योगेश सोपान मारकड (३०, रा. देगाव, ता. बार्शी) यांनी पांगरी पोलीसांत ४ फेब्रुवारीला रात्री तक्रार दिली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयात दहावी, बारावीचे वर्ग सुरू आहेत. इतर वर्ग ७ फेब्रुवारीपासून सुरू करावयाचे असल्याने इतर वर्गाच्या दुरुस्ती आणि पाहणीसाठी गेले असता प्रभारी मुख्याध्यापकांना संगणक कक्षाचे कुलूप तोडल्याचे पाहायला मिळाले. आत जाऊन पाहणी केली असता ११ संगणक, दाेन प्रिंटर, दोन एलसीडी आदी सुमाने सव्वालाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे. सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गावाबाहेर आहे. दि. २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत संगणक कक्ष बंद होते. याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून ही धाडसी चोरी केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल ननवरे करीत आहेत.