11 crore Rupees Scam in SBI:चिल्लर चोरी करत करत मारला ११ कोटींवर डल्ला, SBIच्या शाखेतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 04:38 PM2021-08-18T16:38:06+5:302021-08-18T16:39:23+5:30

11 crore Rupees Scam in SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये चक्क चिल्लरमध्ये अफरातफर करत तब्बल ११ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

11 crore Rupees Scam in SBI: coins stole and scam over Rs 11 crore Rupees, shocking incident in SBI branch In Rajasthan | 11 crore Rupees Scam in SBI:चिल्लर चोरी करत करत मारला ११ कोटींवर डल्ला, SBIच्या शाखेतील धक्कादायक प्रकार

11 crore Rupees Scam in SBI:चिल्लर चोरी करत करत मारला ११ कोटींवर डल्ला, SBIच्या शाखेतील धक्कादायक प्रकार

Next

जयपूर - थेंबे थेंबे तळे साचे म्हण तुम्ही ऐकली असेलच. तसाच एक एक रुपया जमवून मोठी रक्कम साठवता येते हेही तुम्हाला माहिती आहे. मात्र राजस्थानमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये चक्क चिल्लरमध्ये अफरातफर करत तब्बल ११ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (11 crore Rupees Scam in SBI) राजस्थानमधील करौली जिल्ह्यामध्ये  मेहंदीपूर बालाजीस्थित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये हा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनी बँकेच्या शाखेत येऊन या संबंधीची कागदपत्रे गोळा केली आहेत. तसेच तिथे कार्यरत असलेल्या  कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. सध्या शाखेमध्ये सुमारे ६०० ते ७०० नाण्यांच्या बॅगांची मोजणी होणे बाकी आहे. त्याची  अंदाजित किंमत ही सुमारे ६० लाख रुपये आहे. (coins stole and scam over Rs 11 crore Rupees, shocking incident in SBI branch In Rajasthan )

याबाबत टोडाभीमचे पोलीस अधिकारी रामखिलाडी मीणा यांनी सांगितले की, नाण्यांच्या अफरातफरीची चौकशी एसबीआयची व्हिजिलेंस टीम आधीपासून करत आहे. व्हिजिलेंसच्या चौकशीबरोबरच पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर विविध बाजूंनी तपासास सुरुवात केली आहे. बँकेचे शाखाव्यवस्थापक हरगोविंद सिंह मीणा यांनी घोटाळ्याच्या काळात शाखेतील व्यवस्थापकांसह चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपर्यंतच्या १४-१५ कर्मचाऱ्यांची माहिती पोलिसांना दिली आहे.

बँकेच्या शाखा व्यवस्थापनाने हल्लीच एसपी मृदुल कछ्चावा यांच्याकडे ११ कोटी रुपयांच्या नाण्यांच्या अफरातफरीची तक्रार दिली होती. त्यानंतर सोमवारी टोडाभीम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. तसेच तपासासा सुरुवात झाली होती. बँकेच्या प्रादेशिक शाखेच्या आदेशानुसार या शाखेतील नाण्यांची मोजणी करण्यात येत होती. त्यामध्ये १० ऑगस्टपर्यंत झालेल्या मोजणीत सुमारे ११ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या संदर्भात दिलेल्या तक्रारीमध्ये २१ मे रोजी शाखेत असलेले कॅश अधिकारी राजेश कुमार मीणा यांना शाखेतून जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेच्या अनधिकृत देवाणघेवणीसंबंधी अनियमिततेसाठी निलंबित करण्यात आले होते. त्याचा तपासही सुरू आहे. दरम्यान, बँकेत सुरू असलेल्या रोख रकमेच्या मोजणीची प्रक्रिया थांबवण्यासाठी मोजणी करण्यात आलेल्या व्हेंजरच्या कर्मचाऱ्यांना १०-१५ सशस्त्र व्यक्तींनी धमकी दिली आहे, यासंदर्भातील तक्रार सतीश शर्मा यांनी दाखल केली आहे. 

Web Title: 11 crore Rupees Scam in SBI: coins stole and scam over Rs 11 crore Rupees, shocking incident in SBI branch In Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.