११ हजार कोटींचे ड्रग्ज वर्षभरात जप्त; डीआरआयची कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:53 AM2023-12-07T09:53:47+5:302023-12-07T09:53:58+5:30

परदेशातून येणारे लोक, कार्गोमार्गे, कुरिअरद्वारे झालेली तस्करी अशा प्रकरणांचा यात समावेश आहे. 

11 thousand crores of drugs seized during the year; Strict action by DRI | ११ हजार कोटींचे ड्रग्ज वर्षभरात जप्त; डीआरआयची कडक कारवाई

११ हजार कोटींचे ड्रग्ज वर्षभरात जप्त; डीआरआयची कडक कारवाई

मुंबई : देशात ड्रग्ज तस्करीत लक्षणीय वाढ झाली असून, केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) मागील वर्षात तब्बल साडेअकरा हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. डीआरआयचा ६६ वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त ‘स्मगलिंग इन इंडिया २०२२-२३’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्याद्वारे ही माहिती पुढे आली आहे. 

अमली पदार्थांविरोधात विभागाने देशभरात एकूण ५२२ कारवाया केल्या. यामध्ये १३०० किलो हेरॉइन, १५० किलो कोकेन, २५० किलो एमडी, तब्बल २५ मेट्रिक टन गांजा जप्त केला आहे. परदेशातून येणारे लोक, कार्गोमार्गे, कुरिअरद्वारे झालेली तस्करी अशा प्रकरणांचा यात समावेश आहे. 

 ४५०० कोटींची सीमा शुल्क चोरी  
 ४५०० कोटी रुपयांच्या सीमा शुल्क चोरीची प्रकरणेदेखील विभागाने पकडली आहेत. ही प्रकरणे उजेडात आल्यानंतर यातील १८०० कोटी रुपये वसूल करण्यात डीआरआयला यश आले आहे.

अमलीपदार्थांची नव्हे, तर सोन्याच्या तस्करीतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे यात नमूद आहे. डीआरआयने सोने तस्करीच्या देशामध्ये एकूण २७५ कारवाया केल्या असून, १,४५० किलो सोने पकडले आहे, तसेच २०२१-२२ या वर्षात ८३३ किलो सोन्याची तस्करी उघडकीस आणली होती. या दोन्ही वर्षांच्या कारवाईचा आढावा घेतल्यास सोने तस्करीत दुपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. 

Web Title: 11 thousand crores of drugs seized during the year; Strict action by DRI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.