Mumbai Crime News: मुंबई पुन्हा हादरली! 11 वर्षीय मुलीवर सोसायटीच्या वॉचमनकडून लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:18 AM2021-09-18T11:18:35+5:302021-09-18T11:19:32+5:30
सैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर काहीच दिवसांत हा प्रकार घडला आहे. सोसायटीची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर असते त्या वॉचमननेच मुलीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि हत्येचे प्रकरण ताजे असताना रहिवासी सोसायटीच्या वॉचमनने एका 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Mumbai: An 11-year-old girl was allegedly molested by the watchman of a residential society in Kanjurmarg area.)
कांजुरमार्गमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपी वॉचमनला रात्री अटक केली आहे. या वॉचमनविरोधात पोलिसांनी आयपीसी 354 आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
Mumbai, Maharashtra: An 11-year-old girl was allegedly molested by the watchman of a residential society in Kanjurmarg area. He has been booked under Sec 354 of IPC and POCSO Act on the basis of her statement, and arrested last night. He will be produced before a court today.
— ANI (@ANI) September 18, 2021
साकीनाका बलात्कार प्रकरण
सैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. गुप्तांगात रॉड घुसविण्यात आल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. या आरोपीला अटक करण्यात आली होती. यामुळे आधीच मुंबईत खळबळ उडालेली असताना आता सोसायटीची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर असते त्या वॉचमननेच मुलीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे.