लॉकडाउनच्या काळात सायबरचे ११३ गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:58 AM2020-04-09T06:58:53+5:302020-04-09T06:59:04+5:30
मुंबई : सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या असताना राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
मुंबई : सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या असताना राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कडक पावले उचलली असून राज्यात ११३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी समाज माध्यम बाबत अधिक सतर्क राहून महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्यावतीने करण्यात येत आहे.
टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर अचूक लक्ष ठेवून आहे. राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ६ एप्रिल २०२० पर्यंत ११३ गुन्हे दाखल झाले आहेत .त्यामध्ये बीड १५, पुणे ग्रामीण ११, मुंबई ९, सातारा ७, जळगाव ७ , नाशिक ग्रामीण ६ , नागपूर शहर ४ ,नाशिक शहर ४, ठाणे शहर ४, नांदेड ४, गोंदिया ३, भंडारा ३ , रत्नागिरी ३, जालना ३, परभणी २, अमरावती २, नंदुरबार २, लातूर १, नवीमुंबई १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे . बीडमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्णांमध्ये आरोपींनी फेसबुक किंवा व्हाट्सअँप वर पोस्ट टाकून किंवा शेअर करून त्याद्वारे कोरोना महामारीला जातीय रंग देऊन, त्याद्वारे धार्मिक तेढ व समाजात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे.अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देखील आहे. सदर आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. जर कोणी अपरिचित व्यक्तीने किंवा आपण ज्या व्हाट्सअँप ग्रुप्सवर आहात त्यावर कोणी परिचित , अपरिचित व्यक्तीने असे विडिओ, फोटोज ,मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स ज्यामुळे धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे मेसेज पाठवत असेल , तर लगेच त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये द्यावी . कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या समाज माध्यमांवर पसरवू नयेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये . काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशन कडे संपर्क साधावा. सायबर गुन्ह्णांबाबतची माहिती ६६६.ू८ुी१ू१्रेी.ॅङ्म५.्रल्ल वर पाठवावी.