नागपूर विभाग लोहमार्ग पोलिसांनी ११४१ चोरांना पाठविले जेलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 08:07 PM2020-02-25T20:07:01+5:302020-02-25T20:08:18+5:30

लोहमार्ग नागपूर पोलिसांच्या अधिपत्याखाली गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा आणि अकोला अशी सहा पोलीस ठाणी आहेत. या सहा पोलीस ठाण्यांतर्गत १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत ११४१ चोरांना जेलमध्ये पाठविले, तर १२९७ जणांना चोरी करताना पकडले आहे.

1141 thieves were sent to jail by the Nagpur area GRP police | नागपूर विभाग लोहमार्ग पोलिसांनी ११४१ चोरांना पाठविले जेलमध्ये

नागपूर विभाग लोहमार्ग पोलिसांनी ११४१ चोरांना पाठविले जेलमध्ये

Next
ठळक मुद्देसहा पोलीस ठाणे : तीन वर्षांत रेल्वे रुळ ओलांडताना १७० जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोहमार्ग नागपूर पोलिसांच्या अधिपत्याखाली गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा आणि अकोला अशी सहा पोलीस ठाणी आहेत. या सहा पोलीस ठाण्यांतर्गत १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत ११४१ चोरांना जेलमध्ये पाठविले, तर १२९७ जणांना चोरी करताना पकडले आहे. तर याच काळात ११०१ कोर्ट केसेस प्रलंबित असल्याची माहिती लोहमार्ग नागपूर पोलिसांनी माहितीच्या अधिकारात दिली आहे.
अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात लोहमार्ग नागपूर पोलिसांना त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत माहिती मागविली. त्याअंतर्गत जनमाहिती अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) वासुदेव डाबरे यांनी माहिती दिली. नागपूर कार्यक्षेत्रांतर्गत गोंदियाची हद्द २३९ किमी, इतवारी ३६३ किमी, नागपूर १२६, वर्धा ३६३, बडनेरा २३३ किमी, अकोला ३१६ किमी अशी एकूण १६४० किमीची हद्द आहे. तसेच रेल्वे अपघातात तीन वर्षांत ५३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याअंतर्गत गोंदिया हद्दीत ८७, इतवारीत हद्दीत १००, नागपूर १२२, वर्धा १४१ आणि अकोला हद्दीत ७३ तर गोंदिया हद्दीत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तसेच रेल्वे क्रॉसिंगवर बडनेरा येथे तीन वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाला.
तीन वर्षांत लोहमार्ग पोलीस, नागपूरकडे एकूण ८०८६ चोऱ्यांची नोंद झाली असून गोंदिया हद्दीत ५६७ चोऱ्या, इतवारी ३४२, नागपूर २७७०, वर्धा ९०७, बडनेरा १४१३ आणि अकोला हद्दीत २०८७ चोऱ्या झाल्या आहेत. त्याअंतर्गत १४.९० कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. त्यानुसार गोंदिया हद्दीत १.२० कोटी, इतवारी ६६.८९ लाख, नागपूर ३.९० कोटी, वर्धा २.५१ कोटी, बडनेरा २.८७ कोटी, अकोला हद्दीत ३.७४ कोटी रुपयांची चोरी झाली. याशिवाय केवळ वर्धा येथे प्रवाशांच्या पाच वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यांची एकूण किंमत ३९ हजार रुपये आहे. तसेच याच काळात १.९० कोटी रुपये किमतीच्या वस्तू पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामध्ये गोंदियात ३.६६ लाख, इतवारीत २.६२ लाख, नागपूर २४.७३ लाख, १४.४८ लाख, बडनेरा १.४० कोटी, अकोला येथे ४.५० लाख आदींचा समावेश आहे.
तीन वर्षांच्या कालावधीत प्रलंबित ११०१ केसेसमध्ये गोंदियात ८७, इतवारीत ३९०, नागपूर १९३, वर्धा ११९, बडनेरा १६७ आणि अकोला येथे १४५ कोर्ट केसेस प्रलंबित आहेत. पोलिसांनी चोरीदरम्यान १२९७ चोरांना पकडले. यामध्ये गोंदियात १९५, इतवारी ८१, नागपूर ३०१, वर्धा २५८, बडनेरा १५३ आणि अकोला येथे २०३ चोरांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यापैकी गोंदिया येथे ३००, इतवारी ७३, नागपूर ३०१, वर्धा २५८, बडनेरा १५८, अकोला येथे ५१ अशा एकूण ११४१ चोरांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली.
तीन वर्षांच्या कालावधीत प्रलंबित ११०१ केसेसमध्ये गोंदियात ८७, इतवारीत ३९०, नागपूर १९३, वर्धा ११९, बडनेरा १६७ आणि अकोला येथे १४५ कोर्ट केसेस प्रलंबित आहेत. पोलिसांनी चोरीदरम्यान १२९७ चोरांना पकडले. यामध्ये गोंदियात १९५, इतवारी ८१, नागपूर ३०१, वर्धा २५८, बडनेरा १५३ आणि अकोला येथे २०३ चोरांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यापैकी गोंदिया येथे ३००, इतवारी ७३, नागपूर ३०१, वर्धा २५८, बडनेरा १५८, अकोला येथे ५१ अशा एकूण ११४१ चोरांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

 

Web Title: 1141 thieves were sent to jail by the Nagpur area GRP police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.