१२ लाखांची रोकड पळवत लावली कापड दुकानाला आग, २ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 09:26 AM2022-09-27T09:26:51+5:302022-09-27T09:28:09+5:30

दोन कोटीचे नुकसान: वणीच्या मुख्य बाजारपेठेत मध्यरात्रीनंतर घडली घटना

12 lakhs in cash was set on fire at a cloth shop, loss of 2 crores in nashik vani | १२ लाखांची रोकड पळवत लावली कापड दुकानाला आग, २ कोटींचे नुकसान

१२ लाखांची रोकड पळवत लावली कापड दुकानाला आग, २ कोटींचे नुकसान

Next

संतोष कुंडकर

वणी(यवतमाळ): येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सुविधा कापड केंद्र नामक प्रतिष्ठानात शिरलेल्या चोरट्याने दुकानाच्या गल्ल्यातून १२ लाख रूपयांची रोकड पळविली. हा चोरटा एवढ्यावरच थांबला नाही, तर जाताना दुकानाला त्याने आग लावली. यात अंदाजे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाले. ही खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली.

सोमवारी रात्री दुकान बंद होण्याअगोदर ग्राहक बनून हा चोरटा दुकानात शिरला. तेथेच तो लपून बसला. दुकान बंद झाल्यानंतर पहाटे २ दोन वाजताच्या सुमारास त्याने हे कृत्य केले असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तीन माळे असलेल्या या दुकानाच्या दोन माळ्याच्या शटरला बाहेरून कुलूप होते, तर तिसऱ्या माळ्यावरील शटरला आतून कुलूप होते. चोरट्याने दुकानातीलच शर्टाचा लांब कापड घेऊन त्याची दोरी बनवली. त्यानंतर तिसऱ्या माळ्यावरील शटरचे कुलूप तोडून चोरटा बाहेर पडला व कापडापासून तयार केलेल्या दोरीच्या सहाय्याने तीन माळे खाली उतरून तो पळून गेला, असा प्राथमिक अंदाज आहे. पळून जाण्यापूर्वी चोरट्याने पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरील दुकान पेटवून दिले. काही वेळानंतर आगीचे लोळ बाहेर पडू लागले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच,  दुकानाचे संचालक प्रशांत गुंडावार व प्रविण गुंडावार यांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच अग्नीशमन दलालाही याबाबत सूचना देण्यात आली. अग्निशमन दल व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या दुकानात १० ते १२ कोटी रूपयांचा माल ठेवून होता. आगीत दोन कोटी रूपयांचा माल जळून खाक झाला. वणी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
 

Web Title: 12 lakhs in cash was set on fire at a cloth shop, loss of 2 crores in nashik vani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.