12 लाखांची रक्कम केली जप्त; चौघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:33 PM2019-04-05T20:33:11+5:302019-04-05T20:35:01+5:30
याबाबत शिवडी पोलीस, आयकर विभाग अधिक तपास करत आहे.
मुंबई - काल पोलीस विभागाच्या पथकाव्दारे शिवडी परिसरात 12 लाखांची रक्कम जप्त केली असून चौघांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत शिवडी पोलीस, आयकर विभाग अधिक तपास करत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, काल मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास शिवडी पोलीस ठाण्याचे हद्दीत शिवडी पोलीस ठाण्याचे रात्रपाळी पोलीस निरीक्षक चंदनशिवे व त्यांचे पथक गस्तीवर असताना पांढऱ्या रंगाच्या टुरिस्ट होन्डा एक्सेंट प्राईम मोटार कार क्र.एम.एच.04 जे.के.2263 या वाहनाची तपासणी केली. या वाहनात जुबेर समिउल्ला खान (24), सय्यद शनबाज मोहम्मद शहा आलम (25), युसुफ उस्मान शेख (30) आणि अकबर सलिम पठाण (31) होते. या इसमांपैकी जुबेर समिउल्ला खान याच्याजवळ शोल्डर बॅग होती. या बॅगमध्ये पैसे असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी याबाबत इसमांना ताब्यात घेऊन शिवडी पोलीस ठाणे येथे चौकशीकरीता नेले. यानंतर दोन पंच बोलावुन त्यांच्यासमक्ष पंचनामा केला असता बॅगमध्ये एकूण 12,01,500 इतकी रक्कम आढळून आली. याबाबत विचारणा केली असता संबंधित इसमाने ही रक्कम तो करीत असलेल्या धंदयासाठी जमा केल्याचे सांगितले. मात्र, ही रक्कम धंदयासाठी कोणाकडून जमा केली याबाबत काही एक समाधानकारक माहिती दिली नाही. याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असून आयकर विभागाचे उपआयुक्त अधिक चौकशी करीत आहेत.