पिंपरीत कंपनीतून सहा लाखांचे एक डझन लॅपटॉप लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 06:36 PM2019-07-09T18:36:33+5:302019-07-09T18:37:22+5:30

कंपनीतील आयटी विभागाच्या दरवाजाचे सीलबंद कुलूप चावीने उघडून सील उघडले.

12 laptops theft from company in the pimpri | पिंपरीत कंपनीतून सहा लाखांचे एक डझन लॅपटॉप लंपास

पिंपरीत कंपनीतून सहा लाखांचे एक डझन लॅपटॉप लंपास

Next

पिंपरी : कंपनीतील आयटी विभागाच्या दरवाजाचे सीलबंद कुलूप चावीने उघडून सील उघडले.  सहा लाख रुपये किमतीचे १२ लॅपटॉप कंपनीमधील अनोळखी इसमाने चोरी केले. चिंचवड येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी सहा ते सोमवारी (दि. ८) सकाळी नऊच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गिरीष उपेंद्र कऱ्हाडे (वय ३८, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. चिंचवड येथील ग्रीव्हज कॉटन कंपनीमधील अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चिंचवड येथील ग्रीव्हज कॉटन कंपनीमधील आयटी विभागाच्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजास सीलबंद कुलूप लावले होते. कंपनीमधील कोणीतरी अज्ञात इसमाने हे कुलूप चावीच्या साह्याने उघडून सील उघडून १२ लॅपटॉपचोरी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: 12 laptops theft from company in the pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.