१२ वर्षीय मुलीला पाळण्याच्या दोरीचा फास लागून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 07:38 PM2019-03-28T19:38:18+5:302019-03-28T19:39:26+5:30

मृत निकिताच्या पश्चात आई-वडिलांसह बारावीत शिकणारी मोठी बहीण व तिसरीत शिकणारा भाऊ आहे.

12-year-old girl gets stuck in rope and died | १२ वर्षीय मुलीला पाळण्याच्या दोरीचा फास लागून मृत्यू

१२ वर्षीय मुलीला पाळण्याच्या दोरीचा फास लागून मृत्यू

Next
ठळक मुद्देघटनेची माहिती मिळताच शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांनी तिच्या घरी धाव घेतली. ताथोडकर कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. शिवाजी उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी होती.

मोर्शी (अमरावती) - पाळण्याच्या दोराचा फास लागून एका १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी स्थानिक गुरुदेवनगर येथे घडली. निकिता संजय ताथोडकर असं मृत मुलीचे नाव आहे. ती शिवाजी उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी होती. वार्षिक परीक्षेचा पेपर नसल्याने ती गुरुवारी दुपारी घरातील पाळण्यावर खेळत होती. खेळताना पाळण्याचा दोर तिच्या गळ्याभोवती आवळला गेला. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांनी तिच्या घरी धाव घेतली. ताथोडकर कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. मृत निकिताच्या पश्चात आई-वडिलांसह बारावीत शिकणारी मोठी बहीण व तिसरीत शिकणारा भाऊ आहे.

 

Web Title: 12-year-old girl gets stuck in rope and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.