ओडिशात मराठी व्यापाऱ्याकडून 1.22 कोटींची रोकड अन् 20 सोन्याची बिस्कीटं जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 11:59 AM2022-08-11T11:59:15+5:302022-08-11T12:00:59+5:30
गंजम जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लांजीपल्ली येथील महामार्गाव गांजांच्या तस्करीची धाडसत्र मोहिम सुरू केली आहे
गंजम - ओडिशातील उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातील एका व्यापाऱ्याकडून तब्बल 1.22 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यासोबतच, संबंधित व्यापाऱ्याकडून 20 सोन्याची बिस्कीटेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गंजम जिल्ह्यातील महामार्गावर 9 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
गंजम जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लांजीपल्ली येथील महामार्गाव गांजांच्या तस्करीची धाडसत्र मोहिम सुरू केली आहे. या धाडसत्र मोहिमेअंतर्गत कारवाई करत असताना, बरहामपूरजवळ त्यांनी ही कारवाई केली. त्यामध्ये, 1.22 कोटी रुपये रोख आणि 20 सोन्याची बिस्कीटे ताब्यात घेण्यात आली आहेत. संबंधित व्यक्ती हा ड्रग्ज डिलर असून तो महाराष्ट्रातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Odisha | On the night of 9th August, an excise team recovered over Rs 1.22 crore in cash and around 20 gold biscuits from the possession of a Maharashtra-based businessman at Lanjipalli in the Ganjam district, during a drive meant to check the smuggling of ganja. pic.twitter.com/kqfLZJNkrq
— ANI (@ANI) August 11, 2022
दरम्यान, संबंधित व्यक्ती महाराष्ट्रातील नेमका कोण आहे, याची अद्याप माहिती नाही. त्यामुळे, ती व्यक्ती उद्योजक आहे की ड्रग्ज पेडलर हे पोलिसांकडून निश्चित सांगण्यात आलं नाही.