12वी पास, रोजची कमाई 5 कोटी; बँक खातं पाहून पोलीस हैराण, 'असा' अडकवायचा जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 11:27 AM2023-05-04T11:27:56+5:302023-05-04T11:35:12+5:30

एका दिवसात 5-10 कोटी रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. त्याने एक टीम बनवली होती.

12th pass cyber criminals srinivas rao daily earning five crores mumbai | 12वी पास, रोजची कमाई 5 कोटी; बँक खातं पाहून पोलीस हैराण, 'असा' अडकवायचा जाळ्यात

फोटो - आजतक

googlenewsNext

एका दिवसात 5-10 कोटी रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. त्याने एक टीम बनवली होती. या टीमचे सदस्य अनेक शहरांमध्ये पसरलेले आहेत. ही टीम पुरुषांपेक्षा अधिक महिलांना लक्ष्य करत असे. चुकीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्यांची फसवणूक करायची. अशा प्रकारे ही टीम दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करत असे.

पोलीस उपायुक्त (झोन-11) अजय कुमार बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार श्रीनिवास राव डाडी (49) याला बांगूर नगर पोलीस स्टेशनच्या पथकाने हैदराबादमधील एका आलिशान हॉटेलमधून ताब्यात घेतलं. त्याने फक्त 12 वी पर्यंतच शिक्षण घेतले आहे, पण तंत्रज्ञानात तो माहीर आहे. पोलीस उपायुक्त पुढे म्हणाले की, श्रीनिवाससोबत त्याच्या टींममधील आणखी चार जणांनाही अटक करण्यात आली आहे. यातील दोघांना ठाण्यातून तर दोघांना कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे.

ही टीम स्वत:ला पोलीस असल्याचे दाखवून फसवणूक करत असे. टीम लोकांना फोन कॉल करत असे, बहुतेक महिला. ज्यांना फोन करण्यात आला त्यांना सांगण्यात आले की त्यांच्या ऑर्डर केलेल्या पार्सलमध्ये (कुरिअर) ड्रग्ज किंवा शस्त्रे आहेत. महिला किंवा पुरुषाला फोन करायचे, त्यांच्याकडून बँक खात्यांचा तपशील मागायचे. कुरिअर व्हेरिफिकेशन बँकेच्या तपशिलाद्वारे सांगण्यात आले. तसेच कुरिअर कोणाचे आहे, हे यावरून कळवू, असेही सांगायचे.

पोलीस उपायुक्त पुढे म्हणाले की, बहुतेक लोक फोन कॉलला घाबरायचे आणि टीमला त्यांची बँक किंवा आयकर तपशील द्यायचे. यानंतर वन टाईम पासवर्ड (ओटीपी)ही शेअर केला. महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर फसवणूक करणारे बँक खात्यातून पैसे काढायचे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक प्रकरणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांनी लोकांचे मोबाईल हॅक करून लोकांना त्यांच्या मोबाईलवर Anydesk सारखे एप डाउनलोड करायला लावले. 

अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की. अशा प्रकारे डाडी आणि त्याच्या टीमने देशभरातील हजारो लोकांना लक्ष्य केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीचे सर्व पैसे वडिलांच्या खात्यात जात होते. अधिकाऱ्याने सांगितले की, एका दिवसात 5 कोटी ते 10 कोटी रुपयांचे व्यवहार खात्यात होत असत. डाडी हे सर्व पैसे चीनमधील एका नागरिकाला पाठवायचा आणि ही रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये रुपांतरीत करायचा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 12th pass cyber criminals srinivas rao daily earning five crores mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.