व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करताना गमावले १३ लाख, ऑनलाईन फसवणूक 

By विजय.सैतवाल | Published: February 2, 2024 12:01 PM2024-02-02T12:01:19+5:302024-02-02T12:01:33+5:30

या प्रकरणी पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

13 lakhs lost while completing video viewing task, online fraud | व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करताना गमावले १३ लाख, ऑनलाईन फसवणूक 

व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करताना गमावले १३ लाख, ऑनलाईन फसवणूक 

जळगाव : शेअर चॅटवरील व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली संगीता प्रभाकर घोंगडे (४०, रा. धुळे) यांची १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नोकरदार असलेल्या संगीता घोंगडे यांना १६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान वेळो‌वेळी राजा ठाकूर व पट्टेश रिमाह नाव सांगणाऱ्या दोघांनी व्हाटस् अप व कुशल, ज्योती, चंदेर असे नाव सांगणाऱ्यांनी टेलिग्राम या सोशल मीडियावर संपर्क साधला. त्यात त्यांना शेअर चॅटवरील व्हिडिओ पाहण्याचे टास्क दिले. त्यादरम्यान घोंडगे यांच्याकडून वेळोवेळी १३ लाख ४० हजार ५५० रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्या पैकी ६८ हजार १२७ रुपये महिलेला परत दिले. त्यानंतर मात्र उर्वरित उर्वरित रक्कम परत न देता १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. 

रक्कम परत मिळत नसल्याने संगीता घोंगडे यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.

Web Title: 13 lakhs lost while completing video viewing task, online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.