१३ वर्षाच्या मुलाने ३५ वर्षीय महिलेवर केला बलात्कार; कुत्र्यामुळे संशयित पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 09:21 PM2021-12-23T21:21:33+5:302021-12-23T21:21:58+5:30
Rape Case : कुत्रा चावल्यामुळे आरोपीच्या हाताला झालेली दुखापत पाहता पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
लंडन : ब्रिटनमध्ये एका 35 वर्षीय महिलेवर 13 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना लंडनमधील एका उद्यानातील असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा वाढता वाद पाहता पोलिसांनी कारवाई केली आणि 13 वर्षीय मुलाला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. महिलेवर बलात्कार करणारा दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
१३ वर्षांच्या मुलावर बलात्काराचा आरोप
माय लंडन न्यूजच्या वृत्तानुसार, महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतील १३ वर्षीय मुलाला कुत्र्यामुळे ताब्यात घेण्यात आले आली आहे. या प्रकरणी महिलेने दाखल केलेल्या तक्रार पत्रात असे लिहिले आहे की, लंडनमधील प्लमस्टेड येथील विन्स कॉमन येथे मंगळवारी रात्री 11 वाजता दोन संशयितांनी महिलेवर बलात्कार केला. त्यावेळी तेथे कुत्र्याला फिरवत असलेल्या एका व्यक्तीने एका आरोपीला पकडले. पकडलेला माणूस हा १३ वर्षांचा मुलगा आहे. दोघांमध्ये हाणामारी होत असताना कुत्र्याने आरोपी मुलाच्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. महिलेवर बलात्कार करणारा दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.
कुत्र्याने आरोपीला चावा घेतला
लंडन पोलिसांनी बलात्काराच्या संशयावरून आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. कुत्रा चावल्यामुळे आरोपीच्या हाताला झालेली दुखापत पाहता पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या आधी या महिलेसोबत बलात्कार झाल्याची बातमी आली होती. माहिती मिळताच पोलीस लेकेडेल रोड, SE18 येथे पोहोचले.
पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत
पोलिसांनी सांगितले की, लेकेडेल रोड एसई 18 जवळील झुडपात दोन आरोपींनी 35 वर्षीय महिलेसोबत बलात्कार केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. घटनास्थळी कुत्र्याला फिरवत असलेल्या एका व्यक्तीने संशयिताला पकडण्यात पोलिसांना मदत केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येईल.