धक्कादायक! वडाळ्यात इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून १३ वर्षीय मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 20:10 IST2019-07-11T20:09:13+5:302019-07-11T20:10:19+5:30
गिरनार हाईट्स या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केली

धक्कादायक! वडाळ्यात इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून १३ वर्षीय मुलाची आत्महत्या
मुंबई - वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरनजीक असलेल्या गिरनार हाईट्स या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. वडाळ्यातील या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. आज दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात या घटनेबाबत माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि जागीच जीव गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरनजीक असलेल्या गिरनार हाईट्स या १८ माजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करण्यात आली आहे. मुलगा अल्पवयीन असून मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी सुसाईट नोट सापडली नसून पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलाची आई नॅशनल स्टॉक डिपॉझटरी लि. या कंपनीत तर वडील वोडाफोनमध्ये नोकरी करतात. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून तपास पुढे सुरु असल्याची माहिती सांगळे यांनी दिली.
वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरनजीक असलेल्या गिरनार हाईट्स या इमारतीवरून उडी मारून १३ वर्षीय मुलाने केली आत्महत्या https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 11, 2019