सात नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप;मित्र फिरायला घेऊन निर्जनस्थळी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 09:45 PM2021-08-31T21:45:50+5:302021-08-31T21:46:31+5:30
Gangrape Case : पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.
रांची - झारखंडची राजधानी रांचीच्या मंदारमध्ये १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती पण तिथे तिचा मित्र आणि इतर सहा मुलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.
प्रभारी अधिकारी राणा सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ही बाब गेल्या गुरुवारी घडली आहे. गेल्या गुरुवारी रात्री 7 अल्पवयीन मुलांनी 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीने गेल्या शुक्रवारी मंदार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत चार आरोपींना अटक केली. तर 3 आरोपी अद्याप फरार आहेत.
फिरण्याचा बहाणा करून मित्र घेऊन गेला
या प्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने तिला एका ठिकाणी बोलावले आणि आपल्या दुचाकीवर बसल्यानंतर तिला निर्जन ठिकाणी नेले, तिथे त्याचे आणखी सहा मित्र आधीच होते. सात जणांनी तिच्यावर एकामागून एक बलात्कार केले.
सामूहिक बलात्कारानंतर पीडितेला तिच्या मैत्रिणीच्या घराजवळ सोडले
घटनेनंतर आरोपीने पीडितेला तिच्या मैत्रिणीच्या घराजवळ सोडले. पीडितेने येथे एक भयानक आणि धक्कादायक घटनेनंतर एक रात्र काढली आणि नंतर सकाळी घरी पोहचली आणि नंतर तिने तिच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले आणि एफआयआर दाखल केला.
प्रभारी अधिकारी राणा सिंह म्हणाले की, मंदार पोलिसांनी या प्रकरणातील 7 पैकी 4 आरोपींना अटक केली आहे. परंतु इतर 3 जणांचा शोध अद्याप सुरू आहे.