अमानुषतेचा कळस! 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; डोळे फोडले अन् जीभही कापली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 11:42 AM2020-08-16T11:42:12+5:302020-08-16T16:52:52+5:30

मागील आठवड्यात उत्तरप्रदेशमध्ये सहा वर्षीय मुलीवर अपहरण करू बलात्कार केला गेला होता.

13-Year-Old Raped, Strangled In UP; Cops Deny , Tongue Cut | अमानुषतेचा कळस! 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; डोळे फोडले अन् जीभही कापली

अमानुषतेचा कळस! 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; डोळे फोडले अन् जीभही कापली

Next

लखनौ : उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. येथील लखीमपूर खीरी जिल्ह्यात 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी ऊसाच्या शेतात या मुलीचे मृतदेह पोलिसांना सापडले. राज्यातील मागील काही दिवसांतील ही दुसरी भयानक घटना आहे. या प्रकरणी गावातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुलीची गळा दाबून हत्या केली, तिचे डोळे फोडले आणि जीभही कापल्याचा दावा पिडीत मुलीच्या वडीलांनी केला. शुक्रवारी ही घटना घडली. लखनौपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव नेपाळ सीमेनजीक आहे. तिचा मृतदेह एका आरोपिच्या शेतात सापडला. रविवारी मुलीच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आला आणि त्यात डोळे फोडल्याचा किंवा जीभ कापली नसल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. शवविच्छेदनात बलात्कार आणि गळा आवळण्याचा उल्लेख केला आहे. 

''तिचे डोळे फोडलेले नाहीत आणि जीभही कापली गेली नाही. तो दावा खोटा आहे. शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये असे काहीच आढळले नाही. तिच्या डोळ्यानजीक  ओरखडण्याच्या खुणा आहेत आणि त्या ऊसाच्या पानांमुळे झाल्याचे दिसते,''असे पोलिस अधिकारी खेरी सतेंद्र कुमार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,''तिच्यावर बलात्कार झाला आहे. त्याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात बलात्कार, खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.''

शुक्रवारी दुपारपासून ती मुलगी बेपत्ता होती. ''आम्ही तिला सगळीकडे शोधत होतो आणि ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह सापडला. तिचे डोळे फोडले होते आणि जीभ कापली होती. तिच्याच ओढणीनं गळा आवळला होता,''असे मुलीच्या वडीलांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी या घटनेवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विट केलं की,''लखीमपूर खीरी येथे दलित अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ केला गेला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि लाजिरवाणी आहे. अशा घटना घडत आहेत, तर मग सपा आणि भाजपा सरकार यांच्यात काय फरक राहिला? सरकारनं दोषिंवर कठोरात कठोर कारवाई करावी.''  
 


मागील आठवड्यात उत्तरप्रदेश येथील हापूर येथे 6 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. तिचे अपहरण केले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. ती मुलगी अजूनही हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.  
 

 

 

Web Title: 13-Year-Old Raped, Strangled In UP; Cops Deny , Tongue Cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.