आईवडील शेतात गेलेले असताना १३ वर्षांच्या शाळकरी मुलीने गळफास घेत केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 20:12 IST2021-03-07T20:12:08+5:302021-03-07T20:12:57+5:30
Suicide : पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महादेव कुतवळ हे करीत आहेत.

आईवडील शेतात गेलेले असताना १३ वर्षांच्या शाळकरी मुलीने गळफास घेत केली आत्महत्या
जेजुरी : शिवरी (ता. पुरंदर) येथे एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानी जालिंदर लिंभोरे असे या आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.६) शिवानी जालिंदर लिंभोरे (वय १३, रा. शिवरी, ता. पुरंदर) हिने आईवडील शेतात गेलेले असताना घराच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी शेतातून आईवडील घरी आल्यावर या घटनेचा उलगडा झाला. त्यांनी इतरांच्या मदतीने मृतदेह खाली उतरून उपचारासाठी शिवानीला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मुलीचे वडील जालिंदर सर्जेराव लिंभोरे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली. जेजुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महादेव कुतवळ हे करीत आहेत.