'न्हावा-शेवा' तून जप्त केल्या 14 कोटींच्या विदेशी सिगारेट, मुंबई डीआरआय विभागाने केली कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 01:25 AM2020-11-03T01:25:42+5:302020-11-03T01:26:35+5:30

Uran : उत्तर प्रदेशमधील माफिया टोळीमार्फत दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती.

14 crore foreign cigarettes seized from 'Nhava-Sheva', Mumbai DRI takes action | 'न्हावा-शेवा' तून जप्त केल्या 14 कोटींच्या विदेशी सिगारेट, मुंबई डीआरआय विभागाने केली कारवाई  

'न्हावा-शेवा' तून जप्त केल्या 14 कोटींच्या विदेशी सिगारेट, मुंबई डीआरआय विभागाने केली कारवाई  

googlenewsNext

उरण : न्हावा शेवा बंदरातून मुंबई डीआरआय विभागाने शनिवारी दुबईहून देशात तस्करी केली जात असलेल्या विदेशी सिगरेटचा साठा जप्त केला आहे. या सिगारेट ॲल्युमिनियम कचरा आणि वाहन इंजीनच्या स्पेअरपार्टमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. या सिगारेट साठ्याची किंमत १४ कोटी रुपयांच्या घरात आहे.
उत्तर प्रदेशमधील माफिया टोळीमार्फत दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर न्हावा-शेवा बंदरातून डीआरआय अधिकाऱ्यांनी संशयित कंटेनर ताब्यात घेतला. कंटेनरची कसून तपासणी करताना कंटेनरमध्ये ॲल्युमिनियमचे भंगार आणि इंजीनच्या स्पेअरपार्टच्या नावाखाली आलेल्या सामानात लपवून ठेवलेल्या विदेशी सिगरेटचा साठा सापडला. 
सीमाशुल्क अधिनियम १६२च्या तरतुदीनुसार सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 
मात्र लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती डीआरआय सूत्रांनी दिली. 

सहा महिन्यांतील तिसरी घटना 
nन्हावा शेवा बंदरात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत घडलेली ही तिसरी घटना आहे. चार महिन्यांपूर्वी दुबईतून आयात करण्यात आलेला १२ कोटी किमतीच्या सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता.
 

Web Title: 14 crore foreign cigarettes seized from 'Nhava-Sheva', Mumbai DRI takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.