सांगवीत अज्ञात चोरट्यांकडून १४ लाखांची घरफोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 03:14 PM2018-10-09T15:14:03+5:302018-10-09T15:14:57+5:30
औंध कॅम्प रक्षक सोसायटीत सोमवारी पहाटे घरफोडी झाली.
पिंपरी : औंध कॅम्प रक्षक सोसायटीत सोमवारी पहाटे घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंगला क्रमांक २२ मधुन चार लाख रुपये रोख,अमेरिकन डॉलर,घड्याळे, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने,लॅपटॉप, असा एकुण १४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अज्ञात चोरट्याने बंगल्यात प्रवेश करून ७ आॅक्टोबरच्या रात्रीपासून ते ८ आॅक्टोबरची सकाळ या कालावधीत रक्षक सोसायटीत घरफोडी केली. ललिता दिपक बागवे (वय ६२,रा. रक्षक सोसायटी) यांनी या चोरी प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. सुमारे १४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळवुन नेला. या घटनेनंतर पोलिसांनी वाकड,पिंपळेनिलख, सांगवी परिसरात रात्रीची गस्त वाढवली आहे. रक्षक सोसायटीतील या चोरीच्या तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस.सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.