निर्दयीपणाचा कळस! १४ विद्यार्थ्यांनी शिक्षा म्हणून १६८ वेळा विद्यार्थिनीच्या कानाखाली लगावल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 02:38 PM2019-05-15T14:38:36+5:302019-05-15T14:39:09+5:30

पालकांनी तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

14 students in the class get 168 times slapped as punishment to student | निर्दयीपणाचा कळस! १४ विद्यार्थ्यांनी शिक्षा म्हणून १६८ वेळा विद्यार्थिनीच्या कानाखाली लगावल्या 

निर्दयीपणाचा कळस! १४ विद्यार्थ्यांनी शिक्षा म्हणून १६८ वेळा विद्यार्थिनीच्या कानाखाली लगावल्या 

Next
ठळक मुद्देया विद्यार्थिनीला वर्गातल्याच १४ विद्यार्थ्यांनी कानाखाली मारायचे अशी जबरदस्ती या शिक्षकाने केली. नंतर पालकांनी तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

झाबुआ - मध्य प्रदेशमधील झाबुआ येथे गृहपाठ न केल्याने एका चिडलेल्या शिक्षकानेविद्यार्थीनीला खूपच वेगळी अशी निर्दयी शिक्षा दिली. त्याने या विद्यार्थीनीला दररोज कानाखाली मारण्याची शिक्षा दिली. या विद्यार्थिनीला वर्गातल्याच १४ विद्यार्थ्यांनी कानाखाली मारायचे अशी जबरदस्ती या शिक्षकाने केली. अशाप्रकारे तिला तब्बल १६८ वेळा कानाखाली मारण्यात आली. याबाबत या विद्यार्थिनीने पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नंतर पालकांनी तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

झाबुआ येथील सरकारी शाळेत हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही विद्यार्थिनी शिवप्रताप सिंह यांची यांची मुलगी आहे. ११ जानेवारीला शाळेतील शिक्षकाने तिला गृहपाठ दिला होता. मात्र, ती आजारी असल्याने गृहपाठ न करताच शाळेत गेली. नेहमीप्रमाणेच वर्गशिक्षक मनोज कुमार वर्मा यांनी तिला अभ्यासाबद्दल विचारले असता आपण गृहपाठ केला नाही असे सांगितले. यामुळे चिडलेल्या शिक्षकाने तिच्या वर्गात शिकणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना तिला रोज दोनवेळा  कानाखाली मारण्याची शिक्षा दिली. अखेर तिने घरच्यांना शाळेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या वडीलांनी शिक्षक मनोज कुमार वर्मा याच्याविऱोधात २२ जानेवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तक्रार झाल्याचं कळताच शिक्षकाने गावातून पळ काढला होता. सोमवारी पोलिसांनी या निर्दयी शिक्षकाला अटक केली असल्याची माहिती झाबुआचे पोलीस अधीक्षक एस पी जैन यांनी दिली. 

Web Title: 14 students in the class get 168 times slapped as punishment to student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.