१४ वर्षीय मुलीवर वारंवार मालकाने केला बलात्कार; भिंवडीतील थक्क करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 06:27 PM2021-12-16T18:27:55+5:302021-12-16T18:28:14+5:30

सहा वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून आईही घर सोडून निघून गेली आहे.

14-year-old girl repeatedly raped by employer; A shocking incident in Bhiwandi | १४ वर्षीय मुलीवर वारंवार मालकाने केला बलात्कार; भिंवडीतील थक्क करणारी घटना

१४ वर्षीय मुलीवर वारंवार मालकाने केला बलात्कार; भिंवडीतील थक्क करणारी घटना

Next

भिवंडी- घरकामासाठी ठेवलेल्या १४ वर्षीय अल्पवीयन मुलीवर मालकाने बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून श्रमजीवी संघटनेच्या पाठपुरावा व मागणी नंतर गणेशपुरी पोलीस ठाण्यात नराधम आरोपी विरोधात बुधवारी गुन्हा दाखल करत त्यास गजाआड केले आहे.  लडकू मुकणे असे अटक आरोपीचे नाव आहे.

सहा वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून आईही घर सोडून निघून गेली आहे. त्यामुळे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या असाह्य पीडिताला आरोपीने  नातवंड आणि घराच्या बकऱ्या चरण्यासाठी कामाला ठेवले होते. मे महिन्यात पीडित मुलगी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता आरोपीने तिला जीवेठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. जिवाच्या भीतीने पीडिता घाबरल्याची पाहून आरोपी मालकाची हिंमत वाढली आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता. 

पीडित मुलगी मालकाचा अत्याचार जिवाच्या भीतीने अनेकदा सहन करीत होती. त्यातच १३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीवर आरोपी मालक राहत्या घरात अत्याचार करीत असल्याचे आरोपीच्या पत्नीने पहिले असता तिला धक्काच बसला. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला पतीच्या कृत्यची हकीकत सांगितली. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते येथे पोहचले व तातडीने आरोपी लडकू यांस पोलिसांच्या ताब्यात देऊन रात्री उशिरा अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: 14-year-old girl repeatedly raped by employer; A shocking incident in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.