‘आयकर’चे बनावट ज्वॉइनिंग लेटर देत १४.५० लाखांना गंडा!

By प्रदीप भाकरे | Published: June 22, 2024 03:38 PM2024-06-22T15:38:53+5:302024-06-22T15:40:27+5:30

महिलेच्या तक्रारीवरून सिटी कोतवालीत गुन्हा

14.50 lakhs cheated by giving fake joining letter of 'Income Tax'! | ‘आयकर’चे बनावट ज्वॉइनिंग लेटर देत १४.५० लाखांना गंडा!

‘आयकर’चे बनावट ज्वॉइनिंग लेटर देत १४.५० लाखांना गंडा!

अमरावती: आयकर विभागाचे बनावट ज्वाईनिंग लेटर देऊन एका महिलेची १४ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. १ सप्टेंबर २०१९ ते २ मे २०२२ रोजी दरम्यान ती घटना घडली. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी २१ जून रोजी दुपारी एक महिला, संदीप बाजड, नसुरल्ला शहा (दोघेही रा. अमरावती), कामील, मोहसीन, निरज पांडा (रा. दिल्ली), कदम (रा. खाररोड, मुंबई) व कल्याण रेल्वे जंक्शनवरील एका बिडीओविरूध्द फसवणूक व फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             
खापर्डे बगिचा येथील महिलेच्या तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे परिचयाचे आहेत. आरोपींनी फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करुन त्यांच्या बेरोजगार मुलाला नोकरी लावुन देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी त्या महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. ती रक्कम १४ लाख ५० हजारांपर्यंत पोहोचली. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या मुलाला आरोपींनी आयकर विभागाचे बनावट जॉईनिंग ऑर्डर दिली. मात्र आयकर विभागात जाऊन माहिती घेतली असता ती ऑर्डर बनावट व खोटी असल्याचे उघड झाले. 

त्यामुळे महिलेला फसवणुकीची जाणीव झाली. त्यांनी आरोपींना त्याबाबत जाब विचारला. त्यानंतर दोन वर्ष आरोपींनी ती १४.५० लाख रुपयांची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन वर्ष उलटल्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने महिलेने अखेर पोलीस उपायुक्तांकडे धाव घेतली. सिटी कोतवाली पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या ११ मे रोजीच्या परवानगीनंतर यात २१ जून रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: 14.50 lakhs cheated by giving fake joining letter of 'Income Tax'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.