दीड कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त, डीआरआयची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 04:32 PM2018-11-06T16:32:11+5:302018-11-06T16:32:37+5:30
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी न्हावाशेवा येथे रक्तचंदनाचा मोठा साठा जप्त केल्याचे वृत्त आहे.
- खलील गिरकर
मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी न्हावाशेवा येथे रक्तचंदनाचा मोठा साठा जप्त केल्याचे वृत्त आहे.
कंटेनरमधून सात टन लाकडामध्ये दीड टन रक्तचंदन लपवून नेले जात असल्याची माहिती डीआरआयला गुप्त माहितीदारांकडून मिळाली. त्यानंतर डीआरआयच्या पथकाकडून छापा टाकून रक्तचंदन जप्त करण्यात आले. जेएनपीटी येथून हे रक्तचंदन मध्य पूर्वेतील देशांमध्ये निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात असताना ही कारवाई करण्यात आली. मात्र, या कंटेनरचे चालक व क्लिनर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
पाच लाख रुपये किंमतीच्या साध्या लाकडामध्ये लपवून हे रक्तचंदन नेले जात होते. चीन सारख्या देशांमध्ये फर्निचर बनवण्यासाठी रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. दरम्यान, सीमाशुल्क कायदा कलम 113 अन्वये रक्तचंदनाची निर्यात करण्यावर बंदी आहे.