१५ लाखांची लाच मागितली, राजस्थान एसीबीने ईडी अधिकाऱ्याला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 01:18 PM2023-11-02T13:18:42+5:302023-11-02T13:19:12+5:30
एसीबीने ईडीच्या अधिकाऱ्याला उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याप्रकरणी सापळ्यात अडकविले होते.
गेल्या काही वर्षांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. कधी विरोधक तर कधी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर पैशांच्या अफरातफरीवरून धाडी टाकल्या आहेत. काही उद्योजकांवरही ईडीने छापे मारले आहेत. असे असताना जर ईडीच्या अधिकाऱ्यालाच अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेतले तर, राजस्थान एसीबीने एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाच प्रकरणात ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
ईडीचे अधिकारी नवल किशोर मीना यांच्यावर एका मध्यस्थाकडून १५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या आरोपावरून राजस्थान एसीबीने केंद्रीय एजन्सीच्या या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने राजस्थानमध्ये मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले होते.
एसीबीने ईडीच्या अधिकाऱ्याला उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याप्रकरणी सापळ्यात अडकविले होते. यानंतर त्याच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. यानंतर सापडलेल्या पुराव्यांनुसार त्याला अटक करण्यात आली आहे. लवकरच एसीबी या प्रकरणात अधिकृत घोषणा करेल असे सुत्रांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला सांगितले आहे.