15 लग्न, 4 मुलं; या ट्रिकनं महिलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा पाचवी पास तरूण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 05:05 PM2023-07-11T17:05:45+5:302023-07-11T17:06:14+5:30

2014 पासून आतापर्यंत, त्याने जवळपास 15 महिलांसोबत लग्न केले असून, त्याला चार मुले असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

15 marriages, 4 children; This trick is the fifth pass young man to trap women in his net | 15 लग्न, 4 मुलं; या ट्रिकनं महिलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा पाचवी पास तरूण

15 लग्न, 4 मुलं; या ट्रिकनं महिलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा पाचवी पास तरूण

googlenewsNext

एका तरुणाने ऑनलाईन पद्धतीने महिलांना आमिष दाखवून आणि खोटी आश्वासने देऊन त्यांच्याशी लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हैसूर शहर पोलिसांनी संबंधित तरुणांना रविवारी अटक केली. हा तरुण मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर स्वत:ला इंजिनिअर आणि डॉक्टर असल्याचे सांगत आणि खोटी आश्वासने देत तरुणींसोबत लग्न करायचा. 2014 पासून आतापर्यंत, त्याने जवळपास 15 महिलांसोबत लग्न केले असून, त्याला चार मुले असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महेश केबी नायक (३५) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. तो बनशंकरी, बेंगळुरू येथील रहिवासी आहे.

श्रीमंत तरुणींना अडकवायचा जाळ्यात - 
बंगळुरू येथील एका महिलेने संबंधित तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. महेशने या वर्षाच्या सुरुवातीलाच या महिलेसोबत लग्न केले होते. तक्रारीनंतर, पोलिसांनी एक टीम तयार करून महेशचा शोध सुरू केला आणि त्याला तुमकुरू येथे पकडण्यात आले. महत्वाचे म्हणजे, महेश केवळ पाचवीपर्यंतच शिकलेला आहे. ज्या महिलांनी त्याच्यासोबत ल्गण केले, त्या सर्व आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यावसायिक आहेत. लोक निंदेपोटी या महिला महेशविरुद्ध तक्रार दाखल करत नव्हत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मॅट्रिमोनिअल साइटवर स्वत:ला डॉक्टर, इंजिनिअर अथवा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून सांगायचा. त्याने लग्न केलेल्या महिलांपैकी चार जणींना मुले आहेत. यातच यांपैकी एका महिलेने आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे सांगितले आहे.

तयार केला होता बनावट दवाखाना- 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश नायकने तुमकुरूमध्ये एक बनावट दवाखाना थाटला होता. त्याने येथे एक नर्सदेखील नियुक्त केली होती. याचा उद्देश आपण खरो खरचे डॉक्टर आहोत, हे दाखविणे होता. मात्र, इंग्रजी चांगले नसल्याने त्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला गेला नाही. एवढेच नाही, तर नायकने दवाखाना बांधण्यासाठी पैसे मागीतले होते आणि त्रासही देत होता, असेही संबंधित तक्रारीत म्हणण्यात आले आहे. तसेच, पीडितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो पैसे आणि ज्वेलरी घेऊन फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसुसार, महेशच्या वडिलांनीही त्यच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, असा खुलासा झाल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
 

Web Title: 15 marriages, 4 children; This trick is the fifth pass young man to trap women in his net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.