गोंदियात १५ तलवारी, ७ गुप्त्या, ७ चाकू जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची विशेष कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 11:18 PM2022-11-15T23:18:04+5:302022-11-15T23:18:43+5:30
गोंदिया पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गोंदिया जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
गोंदिया : धारदार घातकशस्त्र गोंदियात विक्रीसाठी आणलेल्या उत्तरप्रदेशातील एका व्यक्तीकडून १५ तलवारी, ७ गुप्त्या, ७ चाकू बाळगणाऱ्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शखोच्या पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अटक केली. त्या आरोपीजवळून २१ हजार ६०० रूपये किंमतीची अवैध हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
गोंदिया पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गोंदिया जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १४ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस हवालदार राजू मिश्रा व पथकाने अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला असता, पोलीस हवालदार राजू मिश्रा यांना निर्मल स्कूल जवळ रेलटोली गोंदिया येथे एक व्यक्ती बेकायदेशीररित्या अवैध शस्त्रे बाळगून विकत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड घातली असता चमकोरसीग स्वर्णसिंग सिंग(५४) रा. क्लेजर उत्तर जिल्हा तामतरन (राज्य पंजाब) याने लावलेल्या दुकानातील टेबलाचे खाली एका पांढ-या रंगाचे प्लास्टीकच्या पोत्यात १५ तलवारी, ७ गुप्त्या, ७ चाकू अशी घातक हत्यारे मिळाली. त्याच्याकडे घातक शस्त्र बाळगण्याचा कसलाही कागदपत्रे, परवाना नव्हता. जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेतील अटींचे उल्लंघन केल्याने अवैध शस्त्रे बाळगल्या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ अन्वये, मुंबई पोलीस कायदा सन १९९१ कलम १३५ शिक्षा कलाम ३७(१)(३) चे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास ठाणेदार संदेश केंजळे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे यांनी कारवाई केली आहे.