सोशल मीडियावरून १५ हजार कोटींचा सट्टा, महादेव ॲपच्या प्रवर्तकासह ३१ जणांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 05:52 AM2023-11-09T05:52:01+5:302023-11-09T05:52:15+5:30

माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. पुढे, न्यायालयाच्या आदेशाने  माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

15 thousand crores bet on social media, case filed in Mumbai against 31 people including promoter of Mahadev app | सोशल मीडियावरून १५ हजार कोटींचा सट्टा, महादेव ॲपच्या प्रवर्तकासह ३१ जणांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

सोशल मीडियावरून १५ हजार कोटींचा सट्टा, महादेव ॲपच्या प्रवर्तकासह ३१ जणांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

मुंबई : महादेव बेटिंग ॲपवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाईचा बडगा उगारलेला असतानाच सोशल मीडिया तसेच विविध पोर्टलवरून १५ हजार कोटी रुपयांचा सट्टा खेळला गेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी महादेव ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरसह ३१ जणांवर माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सट्टेबाजीतून मिळालेला पैसा देश-परदेशात विविध उद्योगांमध्ये गुंतविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत. 
माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. पुढे, न्यायालयाच्या आदेशाने  माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यावर यापूर्वी छत्तीसगड पोलिसांनी विविध प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता आणि त्यांच्याविरुद्ध ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. 

थेट छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे कनेक्शन 
- केवळ क्रिकेटच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर सट्टेबाजीसाठीही महादेव ॲपचा वापर केला जात होता. 
- बहुतेक सट्टेबाजी व्हॉट्सॲप नंबरवरून केली जाते आणि एजंट, विविध पॅनल बनवून कमिशन तत्त्वावर कॉल सेंटर चालवतात.
- महादेव बुक ॲपचे मुख्य कार्यालय यूएईमध्ये आहे.  महादेव बुक ॲपसाठी काम करणारे बहुतेक कर्मचारी छत्तीसगडचे आहेत, जे सौरभ आणि रवी उप्पल यांना ओळखतात आणि ते दुबई आणि यूएईमध्ये स्थायिक झाले आहेत. 
- ऑगस्टमध्ये बेकायदा सट्टेबाजी ॲप प्रकरणात ईडीने अटक केलेल्या सहायक उपनिरीक्षक चंद्रभूषण वर्मा यांच्या चौकशीतून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मित्राने हवाला व्यवहाराद्वारे पैसे मिळवले होते अशी माहिती समोर आली. ईडीद्वारे दाखल आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये कोण?
सौरभ, रवीसह दुबईतील लाला, कुमार, चंदर आग्रवाल, अमन, बेदी, किश लक्ष्मीकांत, हेमंत सुद, भरत चौधरी छत्तीसगडमधून शुभम सोनी, अतुल अग्रवाल, अभिषेक, चंद्र भूषण वर्मा, लंडनमधील दिनेश खंबाट, मुंबईतील खानजम जगदीशकुमार ठक्कर, अमित वर्मा, बॉम्बे, गौरव बर्मन, रणवीर रॉय, वसीम करेशी, मोहित बर्मन, हितेश खुसालनी, साहील खान, पंजाबमधून अमित मुरगाई, रोहितकुमार, राजीव भाटीया, पश्चिम बंगालचा विकास पवन अपरिया, अहमदाबाद, गुजरात अमित मजेठिया, हरेशभाई कलाभाई चौधरी, दिल्लीचा अमित जिदल या आरोपींसह माटुंग्यातील अन्य अनोळखी आरोपींचा समावेश आहे.

खिलाडी बेटिंग ॲपचा वापर
आरोपींनी २०१९ पासून फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल यांसारख्या विविध सोशल नेटवर्किंग साइट्सवर खिलाडी बुक ॲप व इतर अनेक वेबसाईट्स व वेबपोर्टलबाबत माहिती देत किकेट, फुटबॉल, टेनिस, कॅसिनो, तीन पत्तीसह इतर विविध खेळांवर सट्टा खेळण्यासाठी लोकांना जाळ्यात ओढले. आरोपीने खिलाडी बेटिंग ॲपबरोबरच विविध पोर्टल वापरून सरकार आणि इतर अनेकांनी १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यातूनच हजारो कोटी रुपये भारतासह परदेशातील विविध व्यवसायांत गुंतवले.
- प्रकाश बनकर, तक्रारदार

 

Web Title: 15 thousand crores bet on social media, case filed in Mumbai against 31 people including promoter of Mahadev app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.