१५ वर्षीय मुलीने घरात पंख्याला गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 13:57 IST2018-10-16T21:30:42+5:302018-10-17T13:57:26+5:30
अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस याप्रकरणी तपस करत आहेत. साक्षी के. डी. गायकवाड या पालिकेच्या शाळेत नववी इयत्तेत शिकत होती.

१५ वर्षीय मुलीने घरात पंख्याला गळफास घेऊन केली आत्महत्या
मुंबई - सायन कोळीवाडा परिसरात राहत्या घरात १५ वर्षीय साक्षी राजकुमार सिंग या मुलीने सिलिंग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस याप्रकरणी तपस करत आहेत. साक्षी के. डी. गायकवाड या पालिकेच्या शाळेत नववी इयत्तेत शिकत होती. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह सायन रुग्णालयात पाठवला होता.