राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरून कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 10:09 PM2020-05-05T22:09:55+5:302020-05-05T22:12:29+5:30

मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साजित पिल्ले सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

15-year-old girl who collapsed from the first floor of her house pda | राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरून कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरून कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देदुर्देवी रित्या मरण पोचलेल्या जान्हवी सातार्डेकर हीच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर तिचा मृतदेह परिवाराच्या ताब्यात देण्यात आला.गंभीररित्या जखमी झालेल्या जान्हवीला त्वरित उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले मात्र, उपचाराच्या वेळी ती मरण पोचल्याची माहीती मुरगाव पोलीसांनी दिली.

वास्को - दक्षिण गोव्यातील सडा, मुरगाव येथे राहणाऱ्या १५ वर्षीय जान्हवी जगन्नाथ सातार्डेकर या मूलीचा तिच्या राहत्या घरातच पहील्या मजल्यावरून खाली कोसळून दुर्देवी अंत झाला. जान्हवीच्या घरात पहील्या मजल्यावर बांधकाम चालू असून येथे ती गेली असता अचानक तिचा तोल जाऊन ती खाली कोसळली. गंभीररित्या जखमी झालेल्या जान्हवीला त्वरित उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले मात्र, उपचाराच्या वेळी ती मरण पोचल्याची माहीती मुरगाव पोलीसांनी दिली.

मुरगाव पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी (दि. ५) सकाळी ११.३० च्या सुमारास सदर घटना घडली. सडा येथील मारुती मंदीरासमोर राहणाऱ्या १५ वर्षीय जान्हवी हीच्या घराच्या पहील्या मजल्यावर काही प्रकारचे बांधकाम चालू असल्याची माहीती पोलीसांनी दिली. मंगळवारी सकाळी काही कामासाठी जान्हवी पहील्या मजल्यावर गेली असता येथे अचानक तिचा तोल जाऊन ती पहील्या मजल्यावरून घरातच खाली जमनिवर कोसळली. जान्हवी पहील्या मजल्यावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाल्याचे तिच्या परिवारातील सदस्यांना कळताच तिला त्वरित उपचारासाठी प्रथम चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर प्रथमोपचार करून नंतर तिला त्वरित पुढच्या उपचारासठी बांबोळी येथील गोमॅकॉ इस्पितळात पाठवण्यात आले, मात्र येथे पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. मुरगाव पोलीसांना सदर घटनेची माहीती मिळताच त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. दुर्देवी रित्या मरण पोचलेल्या जान्हवी सातार्डेकर हीच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर तिचा मृतदेह परिवाराच्या ताब्यात देण्यात आला.

जान्हवी यावर्षी दहावीत पोचल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त झाली. अशा प्रकारे झालेल्या तिच्या आकस्मिक निधनामुळे तिच्या कुटूंबाबरोबरच शेजाऱ्यांत व जवळपासच्या लोकांना धक्का बसला आहे. जान्हवीचा मृतदेह तिच्या परिवाराच्या ताब्यात दिल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी बोगदा येथील हिंदु स्मशानभूमीत तिच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आल्याची माहीती मुरगाव पोलीसांनी दिली. पहील्या मजल्यावरून खाली कोसळल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती मरण पोचल्याचे शवचिकित्सक अहवालात नमूद करण्यात आलेले असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. अपघाती मरण पोचलेली १५ वर्षीय जान्हवी हीला एक मोठा भाव असून ती आई - वडील व भावासहीत सडा येथे रहायची. मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साजित पिल्ले सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 15-year-old girl who collapsed from the first floor of her house pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.