मूनलायटिंग करताना घातला १६ काेटींचा गंडा, १३९ जणांची झाली फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: May 31, 2023 04:23 AM2023-05-31T04:23:49+5:302023-05-31T04:24:02+5:30
आयटी क्षेत्रात अलीकडे ‘मूनलायटिंग’ ही संकल्पना चांगलीच चर्चेत आहे.
भाग्यश्री गिलडा
पुणे : आयटी क्षेत्रात अलीकडे ‘मूनलायटिंग’ ही संकल्पना चांगलीच चर्चेत आहे. नियमित जॉबव्यतिरिक्त फावल्या वेळेत पार्टटाइम जॉब करण्याचे फॅड आयटीतील तरुणांमध्ये अधिक आहे. याच मानसिकतेचा फायदा सायबर चोरटे घेत आहेत. मूनलायटिंगच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरून जाळ्यात ओढले जाते. या चक्रात अडकलेले तरुण आधी छोटी रक्कम भरतात, मग ती रक्कम परत मिळेल, या आशेपायी आणखी पैसे भरत जातात. अखेर कळते की फसवणूक झाली आहे. गेल्या चार महिन्यांत १३९ जणांना तब्बल १६ कोटींचा गंडा सायबर चोरट्यांनी घातला आहे आणि केवळ एकच गुन्हा उलगडणे शक्य झाले आहे.
चार महिन्यांत १६ कोटींची फसवणूक
मागील चार महिन्यांत सायबर फ्रॉडच्या एकूण १३९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारीनुसार एकूण १५ कोटी ७० लाख २७९ रुपयांची नागरिकांची फसवणूक झालेली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी चार महिन्यांत सर्वाधिक सायबर फसवणूक झाल्याचे आकड्यांवरून लक्षात येते.
कधी-कधी आठवड्यातून दोन दिवस सुटी असते. अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ असते. म्हणून फ्रीलान्सिंग किंवा मूनलायटिंग करतात.
‘टास्क फ्रॉड’
पीडित महिला.
मी प्रॉडक्ट इंजिनिअर आहे. पुरेसा वेळ असतो. म्हणून मी टास्क फ्रॉडला बळी पडलो. नातेवाईक आणि मित्रांकडून पैसे घेऊन भरले आणि गमावले.
‘टास्क फ्रॉड’
पीडित तरुण.
शहरात राहण्याचा खर्च, लाइफस्टाइलसाठी कामाचा शोध सुरू केला. कमी पगार, पार्टटाइम जॉबच्या नादात बचत गमावून बसलो.
‘टास्क फ्रॉड’
पीडित युवक.