धावत्या ट्रेनसमोर १६ वर्षीय युवकानं मारली उडी; सुसाईड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 09:39 AM2021-10-12T09:39:00+5:302021-10-12T09:39:24+5:30

ग्वालियर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल परिसरातील ११ वीत शिकणाऱ्या युवकाने रविवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे.

16-year-old boy jumps in front of running train; PM Narendra Modi name mentioned in the suicide note | धावत्या ट्रेनसमोर १६ वर्षीय युवकानं मारली उडी; सुसाईड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख

धावत्या ट्रेनसमोर १६ वर्षीय युवकानं मारली उडी; सुसाईड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख

Next

ग्वालियर – आयुष्य जगताना अनेक जण डोळ्यात स्वप्न घेऊन जगत असतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींची अपूर्ण राहतात. स्वप्न पूर्ण करण्याची धडपड करत असताना त्यात आलेल्या अपयशाने अनेकांच्या पदरी निराशा येते. त्यामुळे काही जण टोकाचं पाऊल उचलतात. ग्वालियरमध्ये अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. ज्यात १६ वर्षीय युवकानं डोळ्यात साठवलेले स्वप्न पूर्ण न झाल्यानं स्वत:चा जीव दिला आहे.

चांगला डान्सर होऊ शकत नाही म्हणून तरुणानं आत्महत्या केली आहे. मात्र आत्महत्येपूर्वी तरुणानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करण्यात आला आहे. अखेरची इच्छा पंतप्रधानांनी पूर्ण करावी असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. सुसाईड नोटमध्ये गायक अरिजीत सिंह(Arijit Singh) द्वारा गायलेले गीत आणि नेपाळी कलाकार सुशांत खत्री(Sushant Khatri) यांनी कोरियाग्रोफ केलेला डान्सचा म्युझिक व्हिडीओ बनवला जावा असं म्हटलं आहे.

रेल्वेसमोर उडी मारली

झांसी रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी संजीव शर्मा म्हणाले की, ग्वालियर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल परिसरातील ११ वीत शिकणाऱ्या युवकाने रविवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या युवकाच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट आढळली. ज्यात लिहिलं होतं की, मी एक चांगला डान्सर बनू शकलो नाही कारण माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला साथ दिली नाही असं सांगितलं आहे.

आत्म्याला शांती देण्यासाठी म्युझिक व्हिडीओ बनवा

तसेच सुसाईड नोटमध्ये युवकाने त्याच्या मृत्यूनंतर एक म्युझिक व्हिडीओ बनवला जावा. त्यात एक गाणं अरिजीत सिंह आणि नेपाळी कोरिओग्राफर सुशांत खत्रीने डान्स करावा. हा म्युझिक व्हिडीओ माझ्या आत्म्याला शांती देईल. या तरूणाने अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्याकडे मागणी केली आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील चौकशी सुरू आहे. परंतु केवळ चांगला डान्सर बनू शकलो नाही म्हणत आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या घरच्यांना त्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे.

Read in English

Web Title: 16-year-old boy jumps in front of running train; PM Narendra Modi name mentioned in the suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.