१७ बँक खाती, पाटण्यापासून नोएडापर्यंत प्रॉपर्टी; या अधिकाऱ्याची संपत्ती पाहून तपास यंत्रणाही चकित 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:30 AM2021-10-07T11:30:03+5:302021-10-07T11:31:39+5:30

Corruption News: आर्थिक गुन्हे शाखेने जेव्हा वाळूचे अवैध उत्खनन आणि वाळू माफियांशी साटेलोटे असल्याच्या आरोपाखाली राज्यातील उत्खनन विभागाच्या सहाय्यक संचालकांविरोधात कारवाई केली तेव्हा त्यांची संपत्ती पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली.

17 bank accounts, property from Patna to Noida; The investigation team was also shocked to see the assets of this officer | १७ बँक खाती, पाटण्यापासून नोएडापर्यंत प्रॉपर्टी; या अधिकाऱ्याची संपत्ती पाहून तपास यंत्रणाही चकित 

१७ बँक खाती, पाटण्यापासून नोएडापर्यंत प्रॉपर्टी; या अधिकाऱ्याची संपत्ती पाहून तपास यंत्रणाही चकित 

Next

पाटणा - आपल्या देशात भ्रष्टाचाराची पाळंमुळं इतकी लांब आणि खोलपर्यंत पसरलेली आहेत की, ती जेवढी खोदून काढू तितकी ती पुढे पसरलेली दिसून येतात. (Corruption News) भ्रष्टाचाराचं असंच एक प्रकरण बिहारमधून समोर आलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेने जेव्हा वाळूचे अवैध उत्खनन आणि वाळू माफियांशी साटेलोटे असल्याच्या आरोपाखाली राज्यातील उत्खनन विभागाच्या सहाय्यक संचालकांविरोधात कारवाई केली तेव्हा त्यांची संपत्ती पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली. आरोपी अधिकारी संजय कुमार यांच्याकडे तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांची उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती सापडली. तपासामध्ये या अधिकाऱ्याची पाटण्यापासून नोएडापर्यंत संपत्ती असल्याचे समोर आले. या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून संपत्ती जमवल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी विविध ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. (17 bank accounts, property from Patna to Noida; The investigation team was also shocked to see the assets of this officer)

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहाय्यक संचालक असलेल्या संजय कुमार यांच्या पाटणा येथील आर्यकुमार रोडवरील आलिशान घर, मेडिकल शॉप आमि खेतान मार्केटमध्ये असलेल्या खुशी लहंगा स्टोअरवर एकाच वेळी धाड टाकली. वाळू माफियांना मदत करून काळा पैसा जमा केल्याचा संजय कुमार यांच्यावर आरोप आहे. सरकारी नोकरीत असताना पदाचा दुरुपयोग करून संपत्ती जमा केल्या प्रकरणी संजय कुमार यांची आधीपासूनच चौकशी सुरू होती. दरम्यान, बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने डीएसपी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी त्यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर छापे टाकले. तत्पूर्वी मंगळवारी उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीशी संबंधित खटला क्र. १९/२१ मध्ये आर्थिग गुनेहे शाखेने आपल्या कचेरीत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कोर्टाकडून धाड टाकण्यासाठी सर्च वॉरंट काढण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार संजय कुमार १२ नोव्हेंबर १९८७ रोजी सरकारी नोकरीमध्ये नियुक्त झाले होते. त्यांच्याजवळ नोएडामध्ये ३बीएचके आणि १ बीएचकेचा एक एक फ्लॅट असल्याचे समोर आले. त्याशिवाय पाटण्यातील खेतान मार्केट शॉप क्र.  ६७/७२ संजय कुमार यांचाच असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण १७ बँक खाती सापडली आहेत. यामधील १६ बचत खाती आहेत. तर एक चालू खाते आहे. सर्व खात्यांवर मिळून १ कोटी ५८ लाख रुपये मिळाले आहेत. त्याशिवाय ६६ लाख रुपयांची गुंतवणूक अन्य ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.एकूण संजय कुमार यांच्याकडे उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा ५१ टक्के अधिकची संपत्ती सापडली आहे. ती एकूण १ कोटी ३० लाख एवढी होते.

Web Title: 17 bank accounts, property from Patna to Noida; The investigation team was also shocked to see the assets of this officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.