१७ महिलांना आपल्या जाळ्यात फसवून केली त्यांची हत्या, सीरिअल किलरला आता मिळाली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 05:54 PM2022-05-27T17:54:06+5:302022-05-27T17:54:37+5:30
Life imprisonment for Serial Killer: गुरूवारी त्याला ५३ वर्षीय चिट्टी अलीवेलम्माच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याने इतरही १७ महिलांची हत्या केली होती.
Life imprisonment for Serial Killer: तेलंगणातील जोगुलम्हा-गडवाल जिल्ह्यातील एका कोर्टाने १७ महिलांची हत्या करणाऱ्या एका सिरिअल किलरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ताडीच्या दुकानावर महिलांसोबत मैत्री करून त्यांची हत्या करणाऱ्या येरूकली श्रीनूला हत्येप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. गुरूवारी त्याला ५३ वर्षीय चिट्टी अलीवेलम्माच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याने इतरही १७ महिलांची हत्या केली होती.
सीरिअल किलरला २०१९ मध्ये अलीवेलम्माची हत्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. चौकशीतून समोर आली की, त्याने गेल्या एका दशकात १६ इतर महिलांची हत्या केली. श्रीनूची पत्नी सलाम्मा हिलाही चोरीच्या संपत्तीचा स्टॉक करण्याच्या आरोपात अटक केली गेली होती.
दारूची सवय असलेला श्रीनु ताडीच्या दुकानांवर पिण्यासाठी येणाऱ्या महिलांसोबत मैत्री करत होता. पिकनिकच्या नावावर त्यांना निर्जनस्थळी घेऊन जात होता. तो त्यांच्यासोबत दारू पिऊन त्यांची हत्या करत होता आणि त्यांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी करत होता.
श्रीनू तेव्हा पकडला गेला तेव्हा पोलिसांनी अलीवेलम्माच्या ह्त्येची केस सॉल्व केली होती. तिचा मृतदेह १७ डिसेंबर २०१९ ला महबूबनगर जिल्ह्यातील एका गावात सापडला होता. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं होतं की, आरोपीने रंगारेड्डी आणि महबूबनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ताडीच्या दुकानांवर एकट्या महिलांना निशाणा बनवलं होतं.
२००९ मध्येही श्रीनूला काही प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आणि तुरूंगात पाठवलं होतं. त्याला आपल्या भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण २०१३ मध्ये चांगल्या वागणुकीवरून त्याला सोडण्यात आलं होतं. पण त्यात काहीही फरक पडला नाही.
अखेर २०१८ मध्ये तुरूंगातून बाहेर आल्यावर अधिकाऱ्यांनी त्याला एका पेट्रोल पंपावर तो सुधारेल या उद्देशाने नोकरी लावून दिली होती. पण तरीही तो दारू पिऊन गुन्हा करत राहिला. त्याला ११ केसेसमधून निर्दोष सोडण्यात आलं होतं. नुकतंच त्याला दोन केसमधून निर्दोष सोडण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याविरोधात अपील केलं होतं.