आत्महत्येपूर्वी १७ वर्षीय मुलीचं बॉयफ्रेंडला पत्र; “जान, मी कुठेही बिझी नव्हते, मी तुझीच आहे पण...”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 10:18 AM2021-05-15T10:18:57+5:302021-05-15T10:20:18+5:30
शिवानी लहानपणापासून बेगुसराय जिल्ह्यातील लखमिनिया येथे तिच्या आजीच्या घरी राहते. काही दिवसांपूर्वीच ती ननिहालला तिच्या घरी परतली होती.
भागलपूर – बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात सुल्तानगंज परिसरातील किराणा दुकानदाराच्या १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईट नोट लिहिली होती. त्यात तिने तिचा बॉयफ्रेंड, मैत्रिण आणि कुटुंबासोबत तिच्या मनातील वेदना सांगितल्या आहेत. मृत तरूणीचं नाव शिवानी आहे. तिने सुसाईड नोटमध्ये कुणाल, मैत्रिण अमृता आणि कुटुंबासाठी हे पत्र लिहिलं आहे.
शिवानीने सुसाईड नोटमध्ये जे लिहिलंय त्यावरून कळतं की, तिच्या आयुष्यात १६ फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी आणि १२ मार्च सर्वात वाईट दिवस होते. ती म्हणते की, अमृता आज मी माझ्या प्रेमाला, कुटुंबाला केवळ तुझ्यामुळे आणि अमनमुळे सोडत आहे. तुझ्यामुळेच सर्व माझ्याकडे संशयाने पाहत होते. अमन आणि अमृताचा बॉयफ्रेंड होता. शिवानीने सांगितले की, जान, मी कुठेही बिझी नव्हते तर माझा फोन या मुलीने(अमृता) घेतला होता. कारण ती अमनसोबत बोलू शकेल. मी तुझीच आहे, आणि कायम तुझीच राहणार आहे. I Love You. मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं शिवानीने म्हटलं आहे.
त्यानंतर शिवानीने सुसाईड नोटमध्ये कुटुंबाबद्दल लिहिलंय की, My Lovely All Family मी कुणालवर मनापासून प्रेम करते. तुम्हाला तो आवडत नाही. परंतु मला संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं होतं. मी तुम्हाला खूप त्रास दिला. आता यापुढे नाही करणार. सर्व आनंदात राहा. तुमची शिवानी असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. अतिघाईमध्ये लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही वाक्य अर्धवट सोडली आहेत. कदाचित गळाफास घेण्यापूर्वी रूमममध्ये कोणी येण्याची भीती शिवानीच्या मनात होती. शिवानी लहानपणापासून बेगुसराय जिल्ह्यातील लखमिनिया येथे तिच्या आजीच्या घरी राहते. काही दिवसांपूर्वीच ती ननिहालला तिच्या घरी परतली होती. शिवानीच्या वडिलांचे किराणा मालाचं दुकान आहे.
अंघोळीच्या बहाण्याने रुममध्ये गेली गळफास घेतला
गुरुवारी दुपारी १२ च्या आसपास शिवानी अंघोळीच्या बहाण्याने दुसऱ्या मजल्यावर गेली. परंतु दीड तास उलटले तरी परतली नाही. त्यावेळी दुकानात तिची आई, छोटा भाऊ आणि बहीण होते. आईने तिच्या छोट्या बहिणीला शिवानीकडे पाठवले. तेव्हा बहिणीने आवाज दिला तरी आतमधून दरवाजा उघडला नाही. बहिणीने ही गोष्ट आईला सांगितली. त्यानंतर सर्वजण तिथे पोहचले. दरवाजा तोडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळ्यांना धक्का बसला. शिवानीने गळफास घेतला होता. त्यानंतर ही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. घटनास्थली पोलीस पोहचल्यानंतर त्यांनी तपासाला सुरूवात केली.