१७ वर्षीय नातूच निघाला आजीचा मारेकरी; दारूनं सगळंकाही उद्ध्वस्त केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 05:05 PM2022-08-21T17:05:51+5:302022-08-21T18:41:26+5:30

बहिणीच्या मुलीच्या मुलाने घडविले आजीचे हत्याकांड, खामगाव तालुक्यातील उमरा लासुरा येथील कमलबाई जनार्दन सोनोने या वृध्द महिलेची शुक्रवारी गळादाबून निर्घुन हत्या करण्यात आली

17-year-old grandson killed his grandmother due to Alcohol addict in Buldhana | १७ वर्षीय नातूच निघाला आजीचा मारेकरी; दारूनं सगळंकाही उद्ध्वस्त केलं

१७ वर्षीय नातूच निघाला आजीचा मारेकरी; दारूनं सगळंकाही उद्ध्वस्त केलं

Next

अनिल गवई 

खामगाव: तालुक्यातील उमरा लासुरा येथील ६५ वर्षीय वृध्द महिलेच्या हत्येचे गुढ उकलण्यात पोलिसांना अखेर यश आले. वृध्देची हत्या बहिणीच्या नातवाने त्याच्या मित्राच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत, पुढील कारवाई सुरू केला आहे.

खामगाव तालुक्यातील उमरा लासुरा येथील कमलबाई जनार्दन सोनोने या वृध्द महिलेची शुक्रवारी गळादाबून निर्घुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी हा नात्यातीलच असावा असे काही सुगावे खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या हाती लागले. त्यादिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असता वृध्द महिलेच्या बहिणीच्या नातवाने (मुलीच्या मुलाने) आपल्या अल्पवयीन मित्राच्या साहाय्याने आजीचे हत्याकांड  घडविल्याचे समोर आले. आरोपींना ग्रामीण पोलिसांनी रविवारी अटक केली. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्यामुळे दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

पैसे खर्च झाल्यानेच आजीची हत्या
आईने मामाला देण्यासाठी दिलेले पैसे खर्च झाल्यामुळेच मंगेश याने आपल्या मावस आजीची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. आरोपीला दारू पिण्याची सवय असून, गत काही दिवसांपासून दोन्ही परिवारात संपत्तीवरून वाद सुरू असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होत आहे. रागाच्या भरात नातवाने आजीची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यादिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: 17-year-old grandson killed his grandmother due to Alcohol addict in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस