Income Tax Notice: भाजीवाल्याच्या खात्यात 172 कोटी! बँक बॅलन्स पाहून आयकर अधिकारीही हबकले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:09 AM2023-03-07T11:09:30+5:302023-03-07T11:09:50+5:30
नोटीस मिळताच रस्तोगी यांनी थेट आयकर विभागाचे स्थानिक कार्यालय गाठले आणि याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
गाजीपुरच्या स्त्यावर अब्जाधीश होता याची कोणाला भनक देखील नव्हती. रोज भाजी विकण्यासाठी यायचा. सामान्य भाजीविक्रेत्यासारखाच त्याचे वागणे होते. परंतू, जेव्हा आयकर विभागाला माहिती मिळाली की त्याच्या खात्यात थोडे थोडके नव्हे तर 172 कोटी रुपये आहेत तेव्हा साऱ्यांचे धाबे दणाणले होते. धक्कादायक बाब म्हणजे भाजीवाल्यानुसार त्यालाही त्याच्या खात्यात एवढे पैसे आहेत हे माहिती नव्हते. मग खरे काय?
विनोद रस्तोगी यांना 172.81 कोटी रुपयांच्या व्यवहारात आयकर न भरल्याची नोटीस आली आहे. रस्तोगी यांच्या युनियन बँकेच्या खात्यात 172.81 कोटी रुपये आहेत. या नोटीसीनुसार त्यांनी या रकमेचा कर भरलेला नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
नोटीस मिळताच रस्तोगी यांनी थेट आयकर विभागाचे स्थानिक कार्यालय गाठले आणि याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. ज्या बँक खात्याबाबत आयकर विभागाने म्हटले आहे ते त्यांनी उघडलेले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. तसेच एवढ्या मोठ्या रकमेचे ट्रान्झेक्शनही केलेले नाहीय. कोणीतरी आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करून हे खाते उघडले असल्याचा आरोप रस्तोगी यांनी केला आहे.
रस्तोही भाजी विक्रेता असल्याने आयकर विभागालाही काय घडले असेल ते कळून चुकले आहे. रस्तोगी यांनी देखील पोलिसांशी संपर्क साधला आहे. सायबर सेलकडून व्हेरिफिकेशनसाठी रस्तोगींकडून काही कागदपत्रे मागण्यात आली आहेत. रस्तोगींना सहा महिन्यांपूर्वी देखील आयकरची नोटीस आल्याचे सांगितले जात आहे. दुसरी नोटीस त्यांना २६ फेब्रुवारीला मिळाली आहे.