रेडलाईट एरियात कोंबिग ऑपरेशन करुन १८ मुलींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:10 PM2019-04-01T15:10:34+5:302019-04-01T15:11:27+5:30
बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातील काही घरात मुलींच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ होती .
पुणे : बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात काही घरात मुलींच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरुन परिमंडळ एकमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोबिंग ऑपरेशन करुन १८ मुलींची सुटका केली़.
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी ९ घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
जहाना मोहंमद रजा शेख, रुपा अब्दुलखान (दोघी. रा़. माचिस बिल्डिंग), मैली टिकातमांग (रा़. मर्गी गल्ली), तारा बकतलतमांग, (शिमला साथमनतमांग), यास्मीन मोबीन शेख (तिघी. रा़. वेलकम बिल्डिंग, बुधवार पेठ), काजल गोरे तमांग आणि गंगाबाई कांबळे (दोघी. रा़. बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातील काही घरात मुलींच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी शनिवारी मिळाली़. त्यानंतर परिमंडळ एक मधील १५ पोलीस अधिकारी व ७० पोलीस महिला, पुरुष कर्मचारी त्यांनी सायंकाळी बुधवार पेठेतील सर्व परिसरात कोबिंग ऑपरेशन केले़. संपूर्ण परिसर पिंजून काढला़. त्यात या ९ घरमालकांकडे १८ मुली मिळून आल्या़. या पीडित मुलींकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडून घरमालक, मालकिणी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे व त्यांच्या कमाईतील ५० टक्के पैसे घरमालक घेत असल्याचे सांगितले़. त्यानंतर या १८ मुलींना न्यायालयात हजर केले़ न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या त्यांना हडपसर येथील रेस्क्यु फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले आहे़.
फरासखाना पोलिसांनी या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांची वैयक्तिक माहिती असलेला डाटा तयार केला आहे़. त्यात त्यांच्या फोटोसह आधार कार्ड व अन्य माहिती नमूद केली आहे़. यावरुन बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय चालत असलेल्या सर्व इमारतींमधील सर्व घरांमध्ये जाऊन पोलिसांनी तपासणी केली़. त्यात पोलिसांकडे नोंद नसलेल्या १८ मुली सापडल्या, असे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले़ .