कॉलेज प्रवेशाच्या नावाने १८ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 03:55 AM2019-08-16T03:55:19+5:302019-08-16T03:55:29+5:30

पुणे येथील कॉलेजमध्ये इंजिनीयरिंगला अ‍ॅडमिशन मिळवून देतो असे सांगून तिघांनी एकाची १८ लाखांची फसवणूक केली आहे.

18 lakh fraud in the name of college admission | कॉलेज प्रवेशाच्या नावाने १८ लाखांची फसवणूक

कॉलेज प्रवेशाच्या नावाने १८ लाखांची फसवणूक

Next

पनवेल : पुणे येथील कॉलेजमध्ये इंजिनीयरिंगला अ‍ॅडमिशन मिळवून देतो असे सांगून तिघांनी एकाची १८ लाखांची फसवणूक केली आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
मगनलाल मेंदपराहे कोल्हापूर येथे राहत असून त्यांचा मुलगा ध्रुवकुमारला बारावीत ५५% मिळाले. सीईटीतही कमी गुण मिळाल्याने शासकीय अभियांत्रिकी शाखेत प्रवेश न मिळाल्याने ते मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशासाठी प्रयत्नात होते. त्यांचा मित्र संजय वाघ यांनी असिफ मेस्त्री (पनवेल), व झहीर पिराजी, (पुणे) हे एम.आय.टी. कॉलेजात प्रवेश देतील, असे सांगितले. त्यानुसार मगनलाल हे झहीर, असिफला भेटण्यासाठी पनवेलला आले. प्रवेशासाठी १८ लाख खर्च होईल, असे सांगितले. मगनलाल यांनी पैसे देऊनही मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे मगनलाल यांनी पैसे मागताच त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

Web Title: 18 lakh fraud in the name of college admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.