२० लाखांच्या १८ रिक्षा जप्त, ४ जणांच्या टोळीस अटक; भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कारवाई

By नितीन पंडित | Published: September 23, 2023 04:21 PM2023-09-23T16:21:06+5:302023-09-23T16:21:17+5:30

यावेळी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

18 rickshaws worth 20 lakhs seized, gang of 4 arrested; Big operation of Bhiwandi Crime Branch | २० लाखांच्या १८ रिक्षा जप्त, ४ जणांच्या टोळीस अटक; भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कारवाई

२० लाखांच्या १८ रिक्षा जप्त, ४ जणांच्या टोळीस अटक; भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कारवाई

googlenewsNext

भिवंडी : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाहन चोरीच्या घटनांचा तपास करून चार जणांच्या टोळीला अटक करून त्यांच्या ताब्यातून २० लाख रुपयांच्या १८ रिक्षा जप्त करून तब्बल १२ गुन्ह्यांची उकल केली असल्याची माहिती गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी शनिवारी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

या रिक्षा ज्या भागातून चोरीस गेल्या होत्या त्या भागातील सीसीटिव्ही फुटेज व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून गुप्त बातमीदाराकडील माहितीच्या आधारे रिक्षा चोरी करणारी टोळी शहरातील नदी नाका येथे रिक्षा विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्या ठिकाणाहुन रशीद युनुस खान,वय ३८, रा.अंधेरी प.,सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना,वय ३८ वर्ष ,रा.मुंब्रा,एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी,वय ४२,रा.कौसा मुंब्रा,जमील अहमद मोहम्मद तय्यब अन्सारी,वय ३५ वर्ष रा.सिद्धीकीनगर,धुळे या चौघांना ताब्यात घेत त्याच्या जवळून ओशिवरा व जुहू पोलिस ठाणे हद्दीतून चोरी झालेल्या दोन रिक्षा जप्त केल्या.या चौकडीकडे अधिक तपास केला असता त्याच्या ताब्यातून एकूण १८ रिक्षा गुन्हे शाखेने जप्त केल्या.

या चार जणांच्या टोळीतील मुंब्रा येथील सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना व एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी हे दोघे वाहन कर्जांचे हप्ते थकीत असलेली वाहने रिकव्हरी करणारे एजेंट म्हणून काम करीत होते.त्यांना रिकव्हरी कंपनीने कामावरून काढून टाकले होते.मात्र त्यांना लॉक असलेली वाहने लॉक तोडून वाहन सुरू करुन घेऊन जाण्याची पद्धत माहित होती. काम सुटल्याने या दोघांनी वाहन चोरी करण्यास सुरुवात केली होती.हि चोरी केलेली वाहने धुळे येथील साथीदार जमील अहमद मोहम्मद तय्यब अन्सारी यास विक्री करीत होते.त्यानंतर जमील ही चोरी केलेल्या रिक्षा धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव या परिसरात विक्री करीत असल्याची माहिती सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे,प्रफुल्ल जाधव, श्रीराज माळी,धनराज केदार,पोलीस उप निरीक्षक राजेंद्र चौधरी,निसार तडवी, हनुमंत वाघमारे,सहाय्यक पोलीस उप निरीक्षक रामचंद्र जाधव,रविंद्र पाटील, राजेश शिंदे,पोलिस हवालदार साबीर शेख,सुनिल साळुंखे,देवानंद पाटील,मंगेश शिर्के, रंगनाथ पाटील,किशोर थोरात,शशीकांत यादव,सचिन साळवी, वामन भोईर,राजेंद्र राठोड,प्रकाश पाटील,अमोल देसाई,महिला पोलिस हवालदार श्रेया खताळ,माया डोंगरे,पोलिस नाईक सचिन जाधव,भावेश घरत,सचिन सोनावणे,उमेश ठाकुर,जालींदर साळुंके, नितीन बैसाणे,पोलिस शिपाई अमोल इंगळे,रविंद्र साळुंके यांनी केली असून आरोपींकडून ओशिवरा,जुहू, बांगुर नगर,अंधेरी,आरे,मुंब्रा,भिवंडी शहर व निजामपूर पोलिस ठाणे हद्दीतील १२ रिक्षा चोरीचा उलगडा केला आहे. तर उर्वरित ६ रिक्षा नेमक्या कोणत्या पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केल्या याचा तपास भिवंडी गुन्हे शाखा करीत आहे .
 

Web Title: 18 rickshaws worth 20 lakhs seized, gang of 4 arrested; Big operation of Bhiwandi Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.