Saraswati Das Suicide : खळबळजनक! 15 दिवसांत 4 आत्महत्या; 18 वर्षीय मॉडेलने गळफास घेऊन संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:07 PM2022-05-30T16:07:08+5:302022-05-30T16:20:32+5:30
Saraswati Das Suicide : . एका 18 वर्षीय मॉडेलने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली - बंगाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक धक्कादाययक घटना समोर येत आहेत. 15 दिवसांत चार आत्महत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिदीशा मुजुमदार (Bidisha Mujumdar), पल्लवी डे (Pallavi De) आणि मंजूषा नियोगीच्या (Manjusha Neogi) निधनानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 18 वर्षीय मॉडेलने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सरस्वती दास (Saraswati Das Suicide) असं मॉडेलचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकत्ता येथील कसबा भागात ही घटना घडली आहे. रविवारी सरस्वतीने घरात तिच्या खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री 2 वाजता सरस्वतीच्या आजीने तिला अशा अवस्थेत पाहिलं आणि तातडीने तिला खाली उतरवून उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती तिच्या आजीसोबत झोपली होती, रात्री 2 वाजता सरस्वती दिसली नाही, तेव्हा त्या त्याला पाहण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेल्या.
जिथे आजीला सरस्वती पंख्याला लटकलेली दिसली. गेल्या 17 वर्षांपासून सरस्वती आपल्या आजीकडेच राहते. तिने दहावीनंतर शिक्षण सोडून दिलं होतं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती घरामध्ये लहान मुलांचा क्लास घ्यायची. यासोबतच मॉडलिंग देखील करत होती. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या रिलेशनशिपमुळे डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.