संतापजनक! १८ वर्षीय बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न, तीन तरुणांनी स्टेडियमच्या छतावरून फेकले खाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 16:29 IST2022-08-18T16:21:25+5:302022-08-18T16:29:37+5:30
basketball player thrown off roof of stadium moga मुलीचे वडील राईस मिलमध्ये काम करतात. मुलगी जबाब नोंदवण्याच्याही परिस्थितीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

संतापजनक! १८ वर्षीय बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न, तीन तरुणांनी स्टेडियमच्या छतावरून फेकले खाली
पंजाबच्या मोंगा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली. १८ वर्षीय बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न झाला आणि ३ तरुणांनी तिला स्टेडियमच्या छतावरून खाली फेकले. यात ती मुलगी गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खेळाडूला लुधियाना येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या पायाला व जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे.
१२ ऑगस्टला ही घटना घडली आणि त्यानंतर हे तीनही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुलगी सरावासाठी मोंगा येथील स्टेडियमवर गेली होती. जतीन कंदा नावाच्या एका आऱोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने प्रतिकार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिला सुमारे २५ फूट उंचीवरून ढकलले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.
जतीन आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध आयपीसीच्या ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि ३७६ (बलात्कार) यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोगाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुलनीत खुराना यांनी गुरुवारी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत.
18-year-old basketball player thrown off roof of stadium in Moga by three youths after rape attempt
— Press Trust of India (@PTI_News) August 18, 2022