पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाकडून लांबविली १८ हजारांची रोकड

By Ajay.patil | Published: April 2, 2023 04:57 PM2023-04-02T16:57:38+5:302023-04-02T16:57:59+5:30

आकाशवाणी चौकातील घटना : गांजा पकडण्याचा केला बनाव, ५ ग्रॅमची अंगठीही लांबविली

18,000 cash was extended from an old man pretending to be a policeman | पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाकडून लांबविली १८ हजारांची रोकड

पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाकडून लांबविली १८ हजारांची रोकड

googlenewsNext

जळगाव- पोलीस असल्याची बतावणी करत, गांजा तपासण्याच्या बहाण्याने एका वृद्धाच्या बोटातील ५ ग्रॅमच्या अंगठीवह १८ हजार रुपयांची रोकड लांबवित एका युवकाने वृद्धाला गंडविले आहे. ही घटना शहरातील आकाशवाणी चौक परिसरात शनिवारी दुपारी ४ वाजता घडली असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरातील कस्तुरी सुपर शॉप मागे रघुनाथ बाबुराव अंबुसकर (वय. ६३) हे वृद्ध वास्तव्यास असून ते सेल्समन म्हणून नोकरी करतात. शनिवारी अंबुसकर हे दुपारी ४ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकाकडून जात असताना, त्यांना एका तरुणाने थांबविले. तसेच आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यावर अंबुसकर यांनी युवकाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, त्या युवकाने शहरात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचे सांगत, आपण गांजा तपासणी करण्याची कारवाईसाठी स्पेशल ड्युटी करत असल्याचे त्या युवकाने सांगितले. त्यानंतर संबधित वृद्धाला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर त्या युवकाने हातचालाखी करीत रघुनाथ अंबुसकर यांच्या बोटात असलेली ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी व १८ हजारांची रोकड तरुणाने काढून घेतली. काही वेळानंतर हा प्रकार अंबुसकर यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.  त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार हे करीत आहे.

Web Title: 18,000 cash was extended from an old man pretending to be a policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.