मीरारोडमधून १९ लाखांच्या अमली पदार्थसह तस्करास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 19:53 IST2021-09-15T19:52:24+5:302021-09-15T19:53:07+5:30
Crime News : मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील सर्कल जवळ एक इसम एम डी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याचे गुन्हे शाखेला समजले.

मीरारोडमधून १९ लाखांच्या अमली पदार्थसह तस्करास अटक
मीरारोड - मीरारोड रेल्वे स्थानक बाहेरून मॅफेड्रोन हे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तस्करास पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्या कडून १८ लाख ९४ हजार ५०० रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील सर्कल जवळ एक इसम एम डी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याचे गुन्हे शाखेला समजले.
गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ महेश पाटील व सहायक आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक देविदास हंडोरे, सहायक निरीक्षक विलास कुटे सह धनाजी इंगळे, पवन पाटील, अजय यादव, ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पथकाने मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी सापळा रचला.
माहितीनुसार तेथे आलेल्या सादक रशीद अन्सारी (१९) रा. एम जे अपार्टमेंट, नगीनदास पाडा, नालासोपारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे एमडी हे अंमली पदार्थ सापडले. ३७९ ग्रॅम वजनाच्या एमडी ची बाजारात १८ लाख ९४ हजार ५०० रुपये इतकी किंमत आहे. नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.