जालन्यात रिव्हॉल्व्हरसह १९ जिवंत काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 06:40 PM2018-11-03T18:40:21+5:302018-11-03T18:41:02+5:30
जालना शहरातील सोनल नगर परिसरात ११ सप्टेंबरला भरदिवसा गणेश भवर यांच्या घरी घरफोडी झाली होती. घरात कोणीही नसताना दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन रोख १ लाख रुपये, आठ तोळे सोने व एक रिव्हॉल्व्हरसह जिवंत राऊंड असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
जालना - शहरातील सोनलनगर परिसरातील गणेश भवर यांच्या घरावर दीड महिन्यापूर्वी डल्ला मारणाऱ्या एका संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हरसह १९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
जालना शहरातील सोनल नगर परिसरात ११ सप्टेंबरला भरदिवसा गणेश भवर यांच्या घरी घरफोडी झाली होती. घरात कोणीही नसताना दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन रोख १ लाख रुपये, आठ तोळे सोने व एक रिव्हॉल्व्हरसह जिवंत राऊंड असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्हाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना रिव्हॉल्व्हर चोराची माहिती मिळाली. या माहितीवरून त्यांनी औरंगाबाद येथे पथकाला पाठवून रिव्हॉल्व्हर चोरास अटक करुन त्याच्याकडून रिव्हॉल्व्हरसह १९ जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, टि. सी. राठोड, हिरामन फलटणकर, वैभव खोकले, किरण मोरे यांच्यासह आदींनी केली.