नेहमीच्या वादातून दोन सुरक्षा रक्षकांनी केली १९ वर्षीय तरुणाची हत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 09:10 PM2021-05-29T21:10:09+5:302021-05-29T21:40:56+5:30

Murder Case : दोघेही आरोपी फरार झाले असून काशीमीरा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

A 19-year-old man was killed by two security guards in an argument | नेहमीच्या वादातून दोन सुरक्षा रक्षकांनी केली १९ वर्षीय तरुणाची हत्या  

नेहमीच्या वादातून दोन सुरक्षा रक्षकांनी केली १९ वर्षीय तरुणाची हत्या  

Next
ठळक मुद्देमीरारोडच्या सृष्टी सेक्टर १ मध्ये हंस इमारती जवळ शुक्रवारच्या मध्यरात्री नंतर शनिवारच्या मध्यरात्री १२ . ३० च्या सुमारास हि घटना घडली.

मीरारोड -  मीरारोडमधील एका इमारतीत राहणारा १९ वर्षीय तरुण आणि इमारतीचे सुरक्षा रक्षक यांच्यातील किरकोळ वादातून झालेल्या भांडणात सुरक्षा रक्षकांनी तरुणाची चाकू भोसकून हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दोघेही आरोपी फरार झाले असून काशीमीरा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

मीरारोडच्या सृष्टी सेक्टर १ मध्ये हंस इमारती जवळ शुक्रवारच्या मध्यरात्री नंतर शनिवारच्या मध्यरात्री १२ . ३० च्या सुमारास हि घटना घडली. येथे कुंभ इमारतीत राहणारा अभिषेक सिंग हा १९ वर्षांचा तरुण मध्यरात्री बाहेरून गृहसंकुलात आला . त्यावेळी सुरक्षा रक्षक सुभाष पांडे व अजित तिवारी सोबत अभिषेकचा वाद झाला आणि त्यावरून शिवीगाळ , झटापट सुरु झाली. पांडे व तिवारी यांनी अभिषेकला मारहाण सुरु केली. सुरक्षा रक्षका कडून अभिषेकच्या पोटात चाकू खुपसण्यात आला . तो रक्तबंबाळ होऊन खाली पडला. ते पाहून पांडे व तिवारी तेथून पसार झाले. 

सदर प्रकार कळताच रहिवाशी व त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु शनिवारी सकाळी ९ . ३० च्या सुमारास अभिषेक चा मृत्यू झाला.  तो त्याचे आई - वडील आणि बहिणीसह रहात होता. 

ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे . या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी सुभाष पांडे व अजित तिवारी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे . सहाय्यक आयुक्त विलास सानप, वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली . त्यांनी गुन्ह्याचा एकूण आढावा घेऊन महत्वाच्या सूचना करत आरोपीना पकडण्यासाठी निर्देश दिले . 

सीसीटीव्ही मध्ये घडलेल्या घटनेची रेकॉर्डिंग झाली असून पोलिसांनी दोन्ही आरोपी सुरक्षारक्षक यांचा शोध चालवला आहे . अभिषेकचे ह्या आधी सुद्धा सुरक्षा रक्षकां सोबत खटके उडाले होते . त्यामुळे नेहमीच्या किरकोळ वादतून हे प्रकरण थेट हत्ये पर्यंत पोहचल्याने त्याची कारणे शोधली जात आहेत . 

अजय तिवारी हा साडे तीन महिन्यां पासून येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता . सुभाष पांडे हा बऱ्याच कालावधी पासून काम करत होता . दोन्ही सुरक्षा रक्षक खाजगी संस्थे कडून नेमताना त्यांची पडताळणी पोलिसानं कडून करून घेतली नव्हती त्यामुळे सदर आरोपींची सविस्तर माहिती पोलीस घेत आहेत .

Web Title: A 19-year-old man was killed by two security guards in an argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.